Dhananjay Mahadik vs Sharad Pawar
Dhananjay Mahadik vs Sharad Pawaresakal

Kolhapur Loksabha : 'शरद पवार गटाचे बडे नेते लवकरच भाजपमध्ये येणार'; महाडिकांच्या दाव्याने पश्‍चिम महाराष्ट्रात खळबळ

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकजण भाजपमध्ये यायला इच्छुक आहेत.
Published on
Summary

लोकसभा निवडणुकीनंतर भाजप ४०० पार जाणार आहे. त्यानंतर देखील काहीजण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचेही महाडिक यांनी सांगितले.

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीपूर्वी (Kolhapur Loksabha Election) कोल्हापूरसह पश्‍चिम महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे अनेक मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा राज्यसभा खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी पत्रकारांशी बोलताना केला. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण असणार याबाबत अजूनही संभ्रम आहे. त्यामुळे दोन्ही मतदारसंघात उमेदवारीवरून तिढा निर्माण झाला आहे.

Dhananjay Mahadik vs Sharad Pawar
Kolhapur Loksabha : कोल्हापूरची जागा राखण्याचं महायुतीसमोर मोठं आव्हान; 'या' नेत्यांना पाळावा लागणार पक्षाचा आदेश

त्यावरून विरोधकांनी देखील कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या (Mahayuti) लोकप्रतिनिधींवर हल्लाबोल चढवला आहे. या पार्श्‍वभूमीवर महाडिक यांनी पश्‍चिम महाराष्ट्रातील शरद पवार (Sharad Pawar) गटाचे मोठे नेते भाजपमध्ये येणार असल्याचे सांगत लोकसभेपूर्वी हा धक्का दिला जाईल, असे सांगितले.

Dhananjay Mahadik vs Sharad Pawar
Hatkanangle Loksabha : राजू शेट्टी भुलवत आणि झुलवत ठेवणारे नेते; निवडणूक जाहीर होताच धैर्यशील मानेंचा प्रहार

‘आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेकजण भाजपमध्ये यायला इच्छुक आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर भाजप ४०० पार जाणार आहे. त्यानंतर देखील काहीजण भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचेही महाडिक यांनी सांगितले. ‘महायुतीमध्ये जागा वाटपाचा कोणताही घोळ नाही. आमचे तिन्हीही नेते सक्षम आहेत. भाजपकडे जागा असावी अशी कोणतीही आग्रही मागणी आम्ही भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे केलेली नाही. कार्यकर्त्यांची भावना आहे की एक जागा आपल्याकडे घ्यावी. मात्र वरिष्ठ नेते योग्य निर्णय घेतील,’ असेही महाडिक म्हणाले.

Dhananjay Mahadik vs Sharad Pawar
Satara Loksabha : भाजपनं उदयनराजेंचं तिकीट कापलं? महाजन म्हणाले, 'राजेंनी तिकीट मागण्याची गरज नाही..'

खासदार संजय मंडलिक यांच्या उमेदवारीला भाजपचे संग्रामसिंह कुपेकर यांनी विरोध केल्याकडे महाडिक यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले,‘भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही पदाधिकारी आणि नेत्यांनी अशी वक्तव्ये करू नयेत. कार्यकर्त्यांनीही अशी वक्तव्ये करताना विचार करावा.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.