आणीबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या उदयसिंगरावांनी तब्बल 1 लाख 54 हजार 443 मताधिक्याने बाजी मारली
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात उदयसिंगराव गायकवाड पाच वेळा खासदार झाल्याचे एकमेव उदाहरण आहे. त्यामुळे कोल्हापूर काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता.
कोल्हापूर : काँग्रेसला (Congress) आणीबाणीचा फटका बसला. त्यानंतर झालेल्या १९८० च्या निवडणुकीत काँग्रेसच्या उदयसिंगराव गायकवाड (Udaysinghrao Gaikwad) यांना उमेदवारी मिळाली. त्यावेळी दोन माजी खासदारांच्या विरोधात लढून ते १ लाख ५४ हजार ४४३ मताधिक्याने विजयी झाले. त्यानंतर ते पाच वेळा काँग्रेसचे खासदार बनले.
जिल्ह्यात काँग्रेसशी एकनिष्ठ असणाऱ्या उदयसिंगराव गायकवाड यांच्या उमेदवारीला अडचण नव्हती. जनता पक्षातील फुटीमुळे काँग्रेस पुन्हा ताकदवान झाला होता. गायकवाड यांच्या विरोधात शेतकरी कामगार पक्षाचे दाजीबा देसाई हे उभे राहिले, तर दुसरे माजी खासदार राजाराम निंबाळकर (Rajaram Nimbalkar) यांनी दिल्लीतून जनता पक्षाचे तिकीट मिळवले. या दोन माजी खासदारांच्या विरोधात खासदार म्हणून गायकवाड यांनी पहिलीच निवडणूक लढवली. यावेळी अन्य नऊ उमेदवार रिंगणात होते.
जनता पक्षातील भांडणाचा मुद्दा मांडत काँग्रेसने प्रचाराला वेग दिला. शेकाप, जनता पक्षांच्या उमेदवारांमुळे मोठी मत विभागणी झाली. दाजिबा देसाई यांना ९१ हजार ३१४, तर निंबाळकर यांना ४६ हजार ५२६ मते मिळाली. त्यावेळी उदयसिंगराव गायकवाड यांना २ लाख ४५ हजार ७५७ मते मिळाली. मतविभागणी तसेच उमेदवारांची संख्या मोठी असतानाही गायकवाड यांना मिळालेली मते काँग्रेसला उभारी मिळाल्याचे दाखवत होते. दीड लाखांवरील मताधिक्य सारेच सांगून गेले. माजी खासदार देसाई व निंबाळकर यांना कमी मते मिळाली. त्यानंतर कोल्हापुरात काँग्रेस म्हणजे गायकवाड असे समीकरण बनले. दिल्ली दरबारीही गायकवाड यांचे वजन मोठे होते.
खासदारकीच्या पाच टर्म
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात उदयसिंगराव गायकवाड पाच वेळा खासदार झाल्याचे एकमेव उदाहरण आहे. त्यामुळे कोल्हापूर काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जात होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.