Kolhapur Loksabha Elections
Kolhapur Loksabha Electionsesakal

Kolhapur Loksabha : शाहू छत्रपती महाराजांच्या प्रचारासह विजयी सभेलाही कोल्हापुरात येणार; उद्धव ठाकरेंची ग्वाही

ठाकरे सांगली दौऱ्यासाठी कोल्हापूर विमानतळावर उतरल्यानंतर थेट नवीन राजवाडा येथे शाहू महाराजांच्या भेटीस आले.
Published on
Summary

शाहू महाराज आणि आमच्या घराण्याचे ऋणानुबंध माझ्या आजोबांपासून आहेत. मला खात्री आहे याही पिढीत आणि पुढील पिढीतही ते कायम राहतील.'

कोल्हापूर : लोकसभेसाठी (Kolhapur Loksabha Elections) महाविकास आघाडीचे कोल्हापूर मतदारसंघाचे उमेदवार म्हणून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) असतील, अशी घोषणा माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवीन राजवाड्यात केली. त्यांनी काल महाराजांची भेट घेऊन कोल्हापूरसह राज्यातील लोकसभेच्या निवडणुकीतील रणनीतीबाबत सुमारे अर्धा तास चर्चा केली.

या वेळी राज्यात इतर ठिकाणीही महाराजांनी सोबत यावे, अशीही विनंती केली. प्रचारसभेला तर येणारच आहे; पण विजयी सभेलाही येणार असल्याचे महाराजांच्या भेटीनंतर ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकारांना सांगितले. कोल्हापूर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे काँग्रेसचे उमेदवार म्हणून महाराजांचे नाव यापूर्वीच निश्‍चित झाले होते. ठाकरे यांनी त्यांची महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली.

Kolhapur Loksabha Elections
Loksabha Election : यादी लांबली... उत्सुकता ताणली; इच्छुक उमेदवारांसह कार्यकर्ते अस्वस्थ, नजरा लागल्या मुंबई-दिल्लीकडे

ठाकरे सांगली दौऱ्यासाठी कोल्हापूर विमानतळावर उतरल्यानंतर थेट नवीन राजवाडा येथे शाहू महाराजांच्या भेटीस आले. माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी त्यांचे स्वागत केले. प्रवेशद्वारातच उद्धव ठाकरे यांनी शाहू महाराजांची गळाभेट घेतली. त्यांच्यासोबत तेजस ठाकरे, खासदार संजय राऊत, शिवसेनेचे सचिव राहुल नार्वेकरसुद्धा होते. बंद खोलीत चहापानासोबतच कोल्हापूर आणि राज्यातील महाविकास आघाडीच्या रणनीतीबाबत सुमारे अर्धा तास चर्चा झाली.

यामध्ये त्यांनी महाराष्ट्र आणि कोल्हापूरमध्ये कोठे, कशा पद्धतीने महाविकास आघाडीकडून रणनीती आखली जाणार आहे, याची माहिती दिली. यानंतर उद्धव ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ठाकरे यांनी सद्यःस्थितीतील राजकीय परिस्थितीवर विचारलेल्या प्रश्‍नांना बगल देत ‘इतर सर्व मुद्दे मी प्रचारसभेत बोलेन’ असे सांगून ते मिरजेच्या सभेसाठी रवाना झाले.

Kolhapur Loksabha Elections
महाराष्ट्र लुबाडला जाताना दाढीवाले मिंधे दिल्लीची चाकरी करतायत, त्यांचे बूट चाटताहेत; ठाकरेंचा घणाघाती हल्ला

यावेळी मधुरिमाराजे छत्रपती, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, माजी आमदार सुजित मिणचेकर, जिल्हाप्रमुख व उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, माजी आमदार संजय घाटगे यांच्यासह ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते. दरम्यान, माजी मुख्यमंत्री व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज हातकणंगले येथील माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर संपर्क कार्यालयास भेट दिली. यावेळी त्यांचा सत्कार डॉ. मिणचेकर, जिल्हाप्रमुख संजय चौगुले, प्रवीण यादव यांच्या हस्ते करण्यात आला.

शाहू महाराजांना शिवसैनिक विजयी करतील...

ठाकरे म्हणाले, ‘शाहू महाराज आणि आमच्या घराण्याचे ऋणानुबंध माझ्या आजोबांपासून आहेत. मला खात्री आहे याही पिढीत आणि पुढील पिढीतही ते कायम राहतील. आज शाहू महाराजांची उमेदवारी महाविकास आघाडीतर्फे जाहीर झाली आहे. शिवसैनिक पूर्ण ताकदीने महाराजांना विजयी केल्याशिवाय राहणार नाहीत. कारण हा महाराष्ट्राच्या आणि मराठीच्या अस्मितेचा प्रश्‍न आहे. मी महाराजांना वचन दिले आहे. प्रचाराला तर येणारच आहे; पण विजयी सभेलाही येणार आहे. आपण सगळे लढत असलेल्या संघर्षात विजय मिळावा म्हणून आशीर्वादही घेऊन मी पुढे जात आहे. मला आज आनंद होतो. कारण शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या १९९७-८८ नंतरच्या भेटीनंतर मी आज येथे आलो आहे.

Kolhapur Loksabha Elections
Kolhapur Loksabha : धैर्यशील माने, मंडलिक अजूनही गॅसवरच; निर्णय लांबल्याने उमदेवारीचा तिढा कायम, कार्यकर्ते अस्वस्थ

विमानतळावर जोरदार स्वागत

शाहू नाका : ठाकरे  दुपारी तीनच्या दरम्यान कोल्हापूर विमानतळावर दाखल झाले. तेथे त्यांचे शिवसैनिकांनी जोरदार स्वागत केले. पक्षाचे उपनेते संजय पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.  त्यांच्यासोबत नितीन बानुगडे-पाटील होते. विमानतळाबाहेर येताच शिवसैनिकांनी ‘कोण आला रे कोण आला  शिवसेनेचा वाघ आला’ अशा जोरदार घोषणा देण्यास सुरुवात केली. काही शिवसैनिकांनी त्यांना चाफ्याची फुले दिले. त्यांच्यासोबत शिवसेना ठाकरे गटाचे सह संपर्कप्रमुख विजय देवणे, जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी आदींसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.