Shahu Chhatrapati Maharaj
Shahu Chhatrapati Maharajesakal

Kolhapur Lok Sabha : 'आजपर्यंत मी समाजकारणात होतो, आता थेट राजकारणात आलो आहे'; काय म्हणाले 'मविआ'चे उमेदवार शाहू महाराज?

'मी मुंबई, दिल्लीत न जाता कोल्हापुरात राहून मला महाविकास आघाडीने उमेदवारी दिली, हीच खरी लोकशाही आहे.'
Published on
Summary

'समाजकारण करताना राजकारण होत आहे. संविधान वाचवायचे आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे.’

कोल्हापूर : ‘लोकशाही (Democracy) एकाधिकारशाहीच्या वळणावर आहे. सत्तेचा उपयोग केला पाहिजे, पण दुरुपयोग होता कामा नये. आजपर्यंत मी समाजकारणात होतो, आता थेट राजकारणात आलो आहे. मी मुंबई, दिल्लीत न जाता कोल्हापुरात राहून मला महाविकास आघाडीने उमेदवारी दिली, हीच खरी लोकशाही आहे’, असे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

याचवेळी त्यांनी मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गाचे रुंदीकरण, कोकणाला रेल्वे (Konkan Railway) जोडणे, विमान, पर्यावरण, गडसंवर्धन, पर्यटन विकास हे मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणार असल्याचे स्पष्ट केले. जनतेच्या आग्रहामुळेच राजकारणात आल्याची स्पष्टोक्तीही त्यांनी दिली.

Shahu Chhatrapati Maharaj
Kolhapur Loksabha : 'अब की बार 400 पार' एवढंच मला माहीत आहे, राज्यात कुठलीही जागा धोक्यात नाही : हसन मुश्रीफ

महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसची (Congress) उमेदवारी मिळाल्यानंतर आज शाहू महाराजांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘शाहू, फुले, आंबेडकरांचा समतेचा विचार आजही महत्त्‍वाचा आहे. तोच पुढे घेऊन जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेली दिशा, रयतेसाठी केलेले काम महत्त्‍वाचे आहे. तेच करण्यासाठी मी राजकारणात आलो आहे. राज्यात व देशात मी एकटाच आहे की, तीनही पक्षांनी माझे नाव उमेदवारीसाठी मनापासून पुढे केले. या सर्वांचा पाठिंबा आहे, त्यामुळेच आज मी तुमच्यासमोर आहे.

कोल्हापुरातील रेल्वे ट्रॅकचे रुंदीकरण, कोल्हापूर-कोकण रेल्वे जोडणे, विमानतळाचे विस्तारीकरण, आरोग्य, पर्यावरण, शेतकरी, प्रदूषणमुक्त पंचगंगा, गडकिल्ले, अंबाबाई मंदिरापासून ऐतिहासिक पर्यटन विकासाचे मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणार आहे.’

सद्यःस्थितीबाबत बोलताना शाहू महाराज म्हणाले, ‘नवीन शैक्षणिक धोरण येणार आहे. पण त्यामध्ये इतिहास बदलता येणार नाही. जे आहे तेच सर्वांसमोर आणणे आवश्‍यक असेल. शक्तिपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांचा विरोध असेल तर त्याचा विचार केला पाहिजे. आहे ते महामार्ग, रस्ते व्यवस्थित होत नाहीत, त्याला प्राधान्य दिले पाहिजे. जेथे तातडीने गरज नाही तेथे शेतकऱ्यांच्या जमिनी जात असतील तर त्याचा पुनर्रविचार केला पाहिजे.

Shahu Chhatrapati Maharaj
Loksabha Election : 'वंचित'सह डाव्यांसाठी नव्याने चर्चा करणार; 'मनसे'च्या महायुतीतील प्रवेशानंतर मविआचा निर्णय

कोल्हापुरात उद्योग यायला पाहिजेत. समाजकारण करताना राजकारण होत आहे. संविधान वाचवायचे आहे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे.’ दरम्यान, आज दिवसभर आमदार पी.एन.पाटील, विविध राजकीय पक्ष, संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांची भेट घेतली.

Shahu Chhatrapati Maharaj
साताऱ्यासाठी शरद पवारांचा 'गेम प्लॅन'; महायुतीच्या उमेदवारावर ठरणार पवारांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार, सस्पेन्स वाढला

शाहू महाराज म्हणाले...

  • कोल्‍हापूरच्या विकासाला दिशा द्यायची आहे.

  • आंदोलन न करता शेतकऱ्यांना हमीभाव मिळाला पाहिजे.

  • विद्यमान खासदारांनी काय काम केले, यावर मी बोलणार नाही.

  • अग्निवीर सैन्यभरतीचा निर्णय कशासाठी हेच कळत नाही.

  • शाहू मिलच्या जागेचे काय करायचे, एक निर्णय घ्यावा लागेल.

  • उमेदवारीसाठी मी सोनिया गांधी, राहुल गांधी किंवा मल्लिकार्जुन खर्गेंना एकदाही भेटलो नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.