Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency
Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituencyesakal

कमळ चिन्हावर लढण्यासाठी शिवसेनेच्या किरण सामंतांवर दबाव; भाजपकडून नारायण राणेंचं नाव पुन्हा आघाडीवर

आधी भाजपकडून माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे नाव चर्चेत आले होते.
Published on
Summary

किरण सामंत यांना कमळ चिन्हावर लढवण्याची ऑफर भाजपने दिली; परंतु त्यांनी ती नाकारली. त्यामुळे भाजपने दबावतंत्राचा वापर सुरू केल्याची चर्चा आहे.

रत्नागिरी : महायुतीतील लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Elections) अंतिम टप्प्यातील जागा वाटप ताणले गेले आहे. विशेषतः रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेच्या जागेवरून भाजप आणि शिवसेनेत (Shiv Sena) प्रचंड चढाओढ सुरू आहे. शिवसेनेकडून किरण ऊर्फ भैया सामंत (Kiran Samant) यांचे नाव आघाडीवर असताना भाजप मतदारसंघावरील दावा सोडायला तयार नाही. आधी भाजपकडून माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे नाव चर्चेत आले होते.

आज केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे नाव पुन्हा आघाडीवर आहे. सामंतांनी कमळ चिन्हावर लढावे म्हणून भाजपचे हे दबावतंत्र असल्याची चर्चा सुरू आहे. भाजपच्या या दबावतंत्रामुळे शिवसेनेच्या उत्साहावर हळूहळू विरजण पडताना दिसत आहे. गेल्या चार दिवसांमध्ये शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये असलेला जोश मावळताना दिसत आहे.

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency
Kolhapur Loksabha : '..म्हणून कोल्हापुरात मान गादीला आणि मत मोदींना असं चालत नाही’; सतेज पाटलांचा थेट निशाणा

कोणत्याही क्षणी काही निर्णय घ्यावा लागू शकतो, या शक्यतेने शिवसेनेच्या गुप्त बैठका सुरू झाल्या आहेत. कार्यकर्त्यांचे म्हणणे जाणून घेतले जात आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency) पारंपरिक शिवसेनेचा आहे. त्यामुळे शिवसेनेने आपला दावा कायम ठेवला आहे; मात्र भाजपने या जागेवर आपला दावा करत शिवसेनेला कोंडीत पकडले आहे. शुक्रवारी (ता. २२) भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. कोकण पट्ट्यामध्ये भाजपला एकतरी जागा असावी यासाठी आग्रह त्यांनी यावेळी धरला.

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency
Sangli Loksabha : उद्धव ठाकरेंची 'मशाल' पेटली! सांगलीच्या जागेसाठी काँग्रेसची हतबलता; बालेकिल्ला निसटणार?

किरण सामंत यांना कमळ चिन्हावर लढवण्याची ऑफर भाजपने दिली; परंतु त्यांनी ती नाकारली. त्यामुळे भाजपने दबावतंत्राचा वापर सुरू केल्याची चर्चा आहे. भाजप-शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांशी मुंबई आणि दिल्लीमध्ये अनेक बैठका झाल्या आणि अजूनही सुरू आहेत. शिवसेनेला ही जागा मिळणार, अशी आतल्या गोटातील बातमी सर्वत्र पसरली आहे; परंतु भाजप ती सहज पदरात पाडून देण्यास तयार नाही. शिवसेनेला भाजपच्या एका नेत्याकडून ग्रीन सिग्नल मिळण्याची आस आहे.

नारायण राणे हे निवडणूक लढणार असतील, तर आम्हाला काळजी करण्याचे कारण नाही. विनायक राऊत यांचा जनसंपर्क आहे. लोकांशी वागण्याची पद्धत आहे. त्यामुळे समोर कोणी असले तरी राऊत अडीच लाखांच्या फरकाने निवडून येतील.

-विलास चाळके, जिल्हाप्रमुख, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()