Kolhapur Lok Sabha Elections
Kolhapur Lok Sabha Electionsesakal

Kolhapur Lok Sabha : महायुतीच्या उमेदवाराची आज घोषणा? कोल्हापूरसाठी 'हे' नाव निश्‍चित होण्याची शक्यता

मुंबईमधून शिवसेनेची (शिंदे गट) पहिली यादी आज जाहीर होईल.
Published on
Summary

कोल्हापूर मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार याबाबत अद्याप अधिकृत कोणतीही घोषणा झाली नाही.

कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीची (Kolhapur Lok Sabha Elections) आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर महायुतीचा उमेदवार कोण, याची चर्चा चांगलीच रंगली आहे; मात्र या तर्कवितर्कांना आज (ता.२६) पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. मुंबईमधून शिवसेनेची (शिंदे गट) पहिली यादी आज जाहीर होईल. त्यामध्ये कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीचाही उल्लेख असेल, असे सांगितले जात आहे.

खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांना पुन्हा एकदा शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाईल, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. हातकणंगले मतदारसंघात (Hatkanangle Constituency) मात्र बदल होणार की पुन्हा एकदा धैर्यशील माने यांनाच उमेदवारी मिळणार याबाबत मोठी उत्सुकता दिसून येत आहे.

Kolhapur Lok Sabha Elections
Sangli Loksabha : उद्धव ठाकरेंची 'मशाल' पेटली! सांगलीच्या जागेसाठी काँग्रेसची हतबलता; बालेकिल्ला निसटणार?

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होऊन आठ दिवस उलटून गेले आहेत. महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या तिकिटावर श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना उमेदवारी मिळाली आहे. त्याची अधिकृत घोषणाही झाली, असे असले तरी महायुतीच्या उमेदवारीबद्दल मात्र संभ्रमाची स्थिती आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (शिंदे गट) आणि भारतीय जनता पक्षात जागा वाटपाबाबत वारंवार चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. मुंबई आणि दिल्लीमध्ये जागावाटपाचे सूत्र निश्‍चित करण्याबाबत चर्चा सुरू असून, यामध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही सहभाग घेतला आहे.

भारतीय जनता पक्षाने (BJP) आतापर्यंत राज्यातील आपल्या दोन याद्या जाहीर केल्या. तरी अद्याप राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांनी मात्र आपल्या एकाही उमेदवाराची अधिकृत घेषणा केलेली नाही. त्यामुळे याबद्दल विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

Kolhapur Lok Sabha Elections
..प्रसंगी रक्त सांडावे लागले तरी बेहत्तर, पण शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही; राजू शेट्टींचा गर्भित इशारा

कोल्हापूर मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार याबाबत अद्याप अधिकृत कोणतीही घोषणा झाली नाही. मात्र, ही जागा खासदार संजय मंडलिक यांनाच मिळणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. हातकणंगले मतदारसंघातून कोण निवडणूक लाढवणार याबाबत मात्र अद्याप निर्णय झालेला नसल्याचे समजते; मात्र याबाबतही मंगळवारी (ता.२६) अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

Kolhapur Lok Sabha Elections
कोल्हापूरच्या बदल्यात सांगली हे ठरलेलंच नव्हतं, विशाल पाटीलच काँग्रेसचे उमेदवार असतील; सतेज पाटलांनी केलं स्पष्ट

मंडलिकांकडून प्रचार सुरू

खासदार संजय मंडलिक यांनी प्रचाराला सुरुवात केली असून, विविध क्षेत्रांतील मान्यवर, जिल्ह्यातील प्रमुख नेते यांची ते भेट घेत आहेत. सोशल मीडियावरूनही मंडलिकांनी आपल्या प्रचाराला सुरू केली असून, जिल्ह्यातील विकासकामांची माहिती त्यांच्याकडून दिली जात आहे. कार्यकर्त्यांचा मेळावाही मंडलिक गटाने घेतला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.