Shahu Chhatrapati Maharaj
Shahu Chhatrapati Maharajesakal

Kolhapur Lok Sabha : संविधान वाचवण्यासाठी शाहू महाराजांना साथ द्या; इंडिया, महाविकास आघाडीच्या नेत्यांचं मतदारांना आवाहन

संविधान (Constitution) धोक्यात आणणाऱ्या शक्तीविरोधात लोकशाहीची आता खरी लढाई सुरू झाली आहे.
Published on
Summary

‘आता संविधान बदलायचे काम सुरू आहे. काँग्रेसने अथवा विरोधकांनी काहीच केले नाही असा खोटा प्रचार सुरू आहे.'

कोल्हापूर : संविधान (Constitution) धोक्यात आणणाऱ्या शक्तीविरोधात लोकशाहीची आता खरी लढाई सुरू झाली आहे. संविधान, लोकशाहीच्या या अस्तित्वाच्या लढाईसाठी इंडिया आणि महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) यांना साथ द्या. त्यांना देशात मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणूया, असा निर्धार कोल्हापूर जिल्ह्यातील इंडिया आणि महाविकास आघाडीच्या प्रमुख नेते, कार्यकर्त्यांनी केला.

Shahu Chhatrapati Maharaj
ज्या महामानवानं भारताला संविधान दिलं, त्याच आंबेडकरांना दोन वेळा काँग्रेसकडून स्वीकारावा लागला पराभव!

येथील न्यू पॅलेस परिसरात बैठक झाली. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील म्हणाले, ‘शाहू महाराजांची उमेदवारी ही सर्वसामान्य जनतेच्या मनातून आलेली आहे. लोकशाही वाचवण्यासाठी ते संसदेत जाणे महत्त्वाचे असल्याने त्यांच्या विजयासाठी आपण सर्वजण जीवाचे रान करूया.’

आमदार पी. एन. पाटील म्हणाले, ‘गेल्या ३५ वर्षांत शाहू महाराजांनी सामाजिक काम करताना, अडचणीत आलेल्या घटकांना मदत करताना कधीही सत्तेचा विचार केला नाही. आता समाजकारणाला ताकद देण्यासाठी त्यांना आपण सर्वांनी निवडून देणे आवश्यक आहे.’

Shahu Chhatrapati Maharaj
Satara Loksabha : साताऱ्यात पाहायला मिळणार तगडी फाईट; उदयनराजेंविरोधात बिचुकले उतरणार लोकसभेच्या रिंगणात!

शाहू महाराज म्हणाले, ‘आता संविधान बदलायचे काम सुरू आहे. काँग्रेसने अथवा विरोधकांनी काहीच केले नाही असा खोटा प्रचार सुरू आहे. अशा वेळी हुकूमशाहीकडे वाटचाल करणारी सत्ता बदलायची असेल तर मतपेटीतूनच ते आपण बदलू शकतो. त्यासाठी जनतेने सज्ज व्हावे.’

Shahu Chhatrapati Maharaj
Satej Patil : 'आम्ही कधीच श्रीपतराव शिंदेंची उणीव भासू देणार नाही'; आमदार सतेज पाटलांची शिंदे गटाला ग्वाही

मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील, शिवसेनेचे सह संपर्कप्रमुख विजय देवणे, जनता दलाच्या स्वाती कोरी, श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष संपत देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, आमदार ऋतुराज पाटील, जयंत आसगावकर, जयश्री जाधव, माजी आमदार मालोजीराजे, संध्यादेवी कुपेकर, संजय पवार, करणसिंह गायकवाड, सूर्यकांत पाटील-बुद्धिहाळकर, सुनील शिंत्रे, सुनील मोदी, रविकिरण इंगवले, प्रताप होगाडे, सुरेश शिपूरकर, शिवाजीराव परुळेकर, अतुल दिघे, उदय नारकर, सुभाष जाधव, सतीशचंद्र कांबळे, गोपाळ पाटील, रवी जाधव, बाबूराव कदम आदी उपस्थित होते. सचिन चव्हाण यांनी स्वागत केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.