Jayant Patil Raju Shetti
Jayant Patil Raju Shettiesakal

राजू शेट्टींचं टेन्शन वाढवणारी बातमी! हातकणंगलेबाबत जयंत पाटलांचं महत्त्वाचं विधान; म्हणाले, तर आम्हालाही..

माढाची जागा आम्ही तुम्हाला देणार आहोत, असे जानकर यांना शरद पवार यांनी उघडपणे सांगितले होते.
Published on
Summary

‘सांगलीत शिवसेनेने उमेदवार घोषित केला आहे. यात आणखी काही मार्ग निघतो का? याचे प्रयत्न सुरू आहेत.'

कोल्हापूर : ‘हातकणंगलेमध्ये (Hatkanangle Constituency) राजू शेट्टी (Raju Shetti) महाविकास आघाडीतर्फे लढावेत, अशी इच्छा होती. मात्र, तसे होताना दिसत नाही. जर त्यांनी आमचा पाठिंबा घेतला नाही, तर या ठिकाणी आम्हाला उमेदवार उभा करावा लागेल’, असे सूतोवाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी येथे केले.

कोल्हापुरातून श्रीमंत शाहू छत्रपती महाराजांनी (Shahu Chhatrapati Maharaj) निवडणुकीत उभे राहावे, यासाठी दोन ते तीन वेळा मी त्यांना भेटलो. आमचे नेते शरद पवार यांच्या विनंतीला मान देऊन ते लोकसभेला उभे राहिले आहेत. शाहू महाराज यांचा सन्मान करवीरवासीय करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीची हातकणंगले मतदारसंघाबाबतची बैठक विमानतळ परिसरात झाली. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Jayant Patil Raju Shetti
Loksabha Election : 'लोकसभा निवडणूक लढाल तरच टिकाल, नाहीतर संपून जाल'; असं का म्हणाले शरद पवार?

‘महाविकास आघाडीच्या बऱ्यापैकी सर्व जागांच्या वाटपाबाबत निर्णय झालेला आहे. केवळ दोन ते तीन जागांबाबतचा प्रश्न कायम आहे. दोन ते तीन दिवसांत त्यावर मार्ग निघेल. वंचित बहुजन आघाडीसोबत (Vanchit Bahujan Aghadi) आमची चर्चा सुरू आहे.’, असे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले. माढाची जागा आम्ही तुम्हाला देणार आहोत, असे जानकर यांना शरद पवार यांनी उघडपणे सांगितले होते. मात्र, जानकर यांचा वेगळा विचार झालेला आहे. त्यामुळे आम्हाला माढ्यातून उमेदवार देण्याचा नव्याने विचार करावा लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Jayant Patil Raju Shetti
'मविआ'ला आपल्या विरोधात अद्याप तगडा उमेदवार देता आलेला नाही, यातच महायुतीची ताकद दिसून येते - रणजितसिंह निंबाळकर

४५ प्लस आहे की नाही, हे महाराष्ट्राला माहीत

‘राज्यात महायुतीने ४५ प्लसचा नारा दिला आहे. लोकांचा आत्मविश्वास टिकवण्यासाठी प्रत्येक पक्ष प्रयत्न करत असतो; पण ४५ प्लस आहे की नाही, हे महाराष्ट्राला माहीत’, असा टोला प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी महायुतीला लगावला. कोल्हापुरात फिरल्यानंतर ४५ मधील एक जागा या ठिकाणी कमी झालेली दिसेल. साताऱ्यातही हीच परिस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.

Jayant Patil Raju Shetti
मागील निवडणुकीत झालेल्या चुका सुधारल्या, आता शेतकऱ्यांचा आवाज बनून लोकसभेत जाणार; राजू शेट्टींना विश्वास

सांगलीबाबत मार्ग काढण्याचा प्रयत्न

‘सांगलीत शिवसेनेने उमेदवार घोषित केला आहे. यात आणखी काही मार्ग निघतो का? याचे प्रयत्न सुरू आहेत. खासदार उदयनराजे यांचा आमच्याशी कोणताही संपर्क नाही. धनगर समाज भाजपवर नाराज आहे. हा समाज यावेळी शंभर टक्के त्यांच्यावर झालेल्या अन्यायाचे उत्तर देईल’, असे प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.