जे स्वत:चे तिकीट एका मिनिटात आणू शकत नाहीत, ते जनतेचे प्रश्न काय सोडविणार? सतेज पाटलांचा मंडलिकांना टोला
‘राज्यात काँग्रेसची एकही जागा निवडून येणार नाही, असे म्हणणारे खासदार धनंजय महाडिक कधीपासून भाकीत सांगू लागले, असे असेल तर माझी कुंडलीपत्रिका घेऊन त्यांच्याकडे जावे लागेल,’ असा टोला आमदार सतेज पाटील यांनी लगावला.
कोल्हापूर : ‘इंडिया आघाडीकडून श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) यांना उमेदवारी देऊन प्रचाराची सुरुवात झाली आहे, तर दुसरीकडे महायुतीमध्ये उमेदवारी कोणाला मिळणार? याबाबत शंका आहे. महायुतीमध्ये सामील होताना ज्यांना बरं वाटलं त्यांना आता तिकिटासाठी पळापळ करावी लागत आहे. जे स्वत:चे तिकीट एका मिनिटात आणू शकत नाहीत, ते जनतेचे प्रश्न काय सोडविणार,’ असा टोला कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी येथे पत्रकारांशी बोलताना खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांचे नाव न घेता लगावला.
तसेच, श्रीमंत शाहू छत्रपती महाराज हे जनतेचे आवाज असून, ते संसदेमध्ये जनतेचे प्रश्न मांडून सोडवतील,’ असा विश्वासही पाटील (Satej Patil) यांनी व्यक्त केला. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे (Kolhapur Lok Sabha Constituency) इंडिया आघाडीचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या छत्रपती शिवाजी स्टेडियम येथील निवडणूक प्रचार मध्यवर्ती कार्यालयाच्या उद्घाटन समारंभानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
भाकपचे ज्येष्ठ कार्यकर्ते बी. एल. बरगे यांच्या हस्ते फीत कापून प्रचार कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी श्रीमंत शाहू छत्रपती महाराज, आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, संजय पवार, व्ही. बी. पाटील, आर. के. पोवार, विजय देवणे, चंद्रकांत यादव, सचिन चव्हाण, विनायक फाळके, तौफिक मुल्लाणी, दिलीप पवार, सतीशचंद्र कांबळे, रघुनाथ कांबळे, डॉ. उदय नारकर, डॉ. सुभाष जाधव, डॉ. टी. एस. पाटील, आदी उपस्थित होते.
धनंजय महाडिक कधीपासून भाकीत सांगू लागले?
‘राज्यात काँग्रेसची एकही जागा निवडून येणार नाही, असे म्हणणारे खासदार धनंजय महाडिक कधीपासून भाकीत सांगू लागले, असे असेल तर माझी कुंडलीपत्रिका घेऊन त्यांच्याकडे जावे लागेल,’ असा टोला आमदार सतेज पाटील यांनी लगावला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.