Kolhapur Lok Sabha
Kolhapur Lok Sabhaesakal

हसन मुश्रीफ कृष्णाच्या तर महाडिक अर्जुनाच्या भूमिकेत, त्यामुळं विजयाची खात्री; काय म्हणाले आमदार पाटील?

खासदार प्रा. संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांचा विजय निश्चित आहे. आता फक्त मताधिक्याची उत्सुकता आहे.
Published on
Summary

‘प्रा. संजय मंडलिक यांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना मत आहे.'

कोल्हापूर : ‘खासदार प्रा. संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांचा विजय निश्चित आहे. आता फक्त मताधिक्याची उत्सुकता आहे. कारण या निवडणुकीत पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) कृष्णाच्या आणि खासदार धनंजय महाडिक अर्जुनाच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे विजयाची खात्री आहे,’ असे प्रतिपादन आमदार राजेश पाटील (Rajesh Patil) यांनी केले. मार्केटयार्ड येथील सुप्रिम हॉल येथे महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली. या वेळी ते बोलत होते.

प्रास्ताविक मुरगूडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार यांनी केले. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, ‘प्रा. संजय मंडलिक यांना मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना मत आहे. विद्यार्थी, नवमतदार, व्यापारी यांच्या मतदानाबद्दल माझ्या मनात शंका नाही. परंतु, बहुजन समाजापर्यंत पोहोचण्याची गरज आहे. कोणत्याही परिस्थितीत प्रा. संजय मंडलिक यांना निवडून आणायचेच याची शपथ घ्या.’

Kolhapur Lok Sabha
Sangli Lok Sabha: हार कर जितने वाले को बाजीगर कहते है! 'राजकारण' फुरसतीनं करायचा विषय नाही, तर..

प्रा. संजय मंडलिक म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून झालेले देशातील काम, महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून झालेले काम ही आमच्याकडे सांगण्यासारखी बाजू आहे. हे कामच जनतेपर्यंत पोहोचवा. विरोधी बाजूकडे सांगण्यासारखे कोणतेही काम नाही. त्यामुळे जनता निश्चित मोठ्या मताधिक्याने मला निवडून देईल.’

Kolhapur Lok Sabha
Kolhapur Lok Sabha : 'हातकणंगलेतून नव्हे, कोल्हापुरातून रिंगणात'; ठाकरेंच्या ऑफरवर काय म्हणाले चेतन नरके?

या वेळी आमदार प्रकाश आबिटकर, नाथाजी पाटील, माजी मंत्री भरमूआण्णा पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, अमल महाडिक, सत्यजित कदम, युवराज पाटील, राहुल चिकोडे, उदयसिंह पाटील- कौलवकर, युवराज पाटील, पी. जी. शिंदे, आदिल फरास आदी उपस्थित होते.

Kolhapur Lok Sabha
दोन्ही राजेंची गळाभेट; पाटलांची 'दादाभेट'! साताऱ्याच्या उमेदवारीसाठी रस्सीखेच; पवारांच्या उमेदवाराचीही घोषणा नाहीच

मंडलिकांच्या विजयासाठी जिवाचे रान करणार : महेश जाधव

भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव म्हणाले, ‘कालचा विषय वेगळा होता. जे बोललो ते रोखठोक बोललो. परंतु, मनात काहीही नाही. भाजपच्या दहा हजारांहून अधिक पदाधिकाऱ्यांसह अहोरात्र काम करू. जीवाचे रान करून मंडलिकांना विजयी करू.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.