Ratnagiri Sindhudurg Lok Sabha
Ratnagiri Sindhudurg Lok Sabhaesakal

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha : 'शेतकऱ्यांसह वानर माकडांचा प्रश्न सोडवेल तोच होणार खासदार'

गेली काही वर्षे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये वानर-माकड उपद्रव सुरू आहे.
Published on
Summary

कोकणातील (Konkan) कोणतेही पीक सुरक्षित राहिलेले नाही. संख्या प्रचंड वाढल्यामुळे रोजचा उपद्रव सुरूच आहे.

पावस : वानर माकडांचा (Monkey) प्रश्न सोडवणार तोच रत्नागिरी-सिंधुदुर्गचा खासदार, अशी त्रस्त शेतकऱ्यांकडून मागणी होऊ लागली आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन निवडणुकीत उतरा, असा आग्रह धरला जात असून रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील वानर माकडांचा गंभीर प्रश्न सुटण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करणार असल्याचे आंबा बागायतदार अविनाश काळे यांनी सांगितले. संसदेमध्ये प्रश्न उपस्थित करून तो कायमस्वरूपी सोडवण्यासाठी शेतकऱ्यांना (Farmers) पाठबळ मिळाले पाहिजे, असेही ते म्हणाले.

गेली काही वर्षे रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये वानर-माकड उपद्रव सुरू आहे. त्यामुळे कोकणातील (Konkan) कोणतेही पीक सुरक्षित राहिलेले नाही. संख्या प्रचंड वाढल्यामुळे रोजचा उपद्रव सुरूच आहे. शारीरिक, मानसिक आणि आर्थिक प्रचंड नुकसानीमुळे शेती, बागायती, भाजीपाला, कडधान्ये उत्पादन करणे आणि त्यावर उपजीविका करणे सर्वसामान्य शेतकऱ्यांना मुश्कील झाले आहे. आंबा राखण करण्यासाठी दोन्ही जिल्ह्यांत मिळून सुमारे २५० कोटींवर खर्च होत आहेत.

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha
..अखेर 'सांगली'बाबत उद्धव ठाकरेंनी ताठर भूमिका सोडली; काँग्रेसशी चर्चा करण्यास तयार, लवकरच निघणार तोडगा?

वानर-माकड हा शाप बनला असून, ते नसतील तर कोकण समृद्ध होईल, अशीच शेतकऱ्यांची अटकळ आहे. त्यांच्या उपद्रवामुळे लवकरच ग्रामीण भाग ओसाड पडेल. सामान्य कष्टकरी शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आहे. सुमारे दीड वर्षे यासाठी शेतकऱ्यांच्या सहकार्याने उपोषण, आमरण उपोषण ते आत्महत्येची परवानगी द्या इथपर्यंत विविध प्रकारची टोकाची आंदोलने केली आहेत. त्यावर तात्पुरता उपाय म्हणून वानर, माकडे पकडून अभयारण्यात सोडण्याचे निश्चित झाले. त्यासाठी किरण सामंत यांनी सहकार्य केले.

पालकमंत्री उदय सामंत यांनी गाड्या आणि पिंजरे यासाठी निधी दिला. मात्र, दीड महिना झाला तरीही त्याला सुरवात झालेली नाही. त्यामुळे शेतकरी आणि बागायतदार नाराज आहेत. शेतकऱ्यांना कुणी वाली नाही, अशीच भावना शेतकऱ्यांमध्ये आहे. सध्या लोकसभा निवडणूक होत आहे. त्यात अनेक उमेदवार रिंगणात उतरतील. रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील निवडून येणारे खासदार कोकणातील प्रश्न संसदेत मांडणार आहेत.

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha
Indira Gandhi : काँग्रेस पक्षात फूट पडली अन् इंदिरा गांधींनी घेतला महिलांच्या काळजाचा ठाव

लोकप्रतिनिधीने पाठपुरावाही करायला हवा

या दोन जिल्ह्यांत कळीचा मुद्दा असलेला वानर-माकड प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी खासदार हवा. त्यांनी संसदेत हा प्रश्न मांडून तो पाठपुरावा करून सोडवायला हवा. प्रत्येक उमेदवाराने ग्रामीण भागात प्रत्येक प्रचार सभेत या प्रश्नाचा उल्लेख करून सोडविण्याची खात्री द्यायला हवी. शेतकरी संघटनेच्या नेत्यांसह रघुनाथदादा पाटील यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन निवडणुकीत उतरा, असा आग्रह धरला आहे. त्यामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्गमधील गंभीर प्रश्न सुटण्यासाठी निवडणुकीत शक्य ते सर्व प्रयत्न करणार आहे, असे आंबा बागायतदार काळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.