Kolhapur MNS : 18 वर्षे झाली तरी, मनसेची अस्तित्वासाठीच लढा; स्थानिक पातळीवर ताकदीच्या नेतृत्वाची गरज!

काही निवडक शहरात अस्तित्व पाहायला मिळणाऱ्या मनसेने कोल्हापुरातही सुरुवात केली; पण त्याला गती मिळालेली नाही.
Kolhapur MNS
Kolhapur MNSesakal
Published on
Summary

लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली असून, यापुढे विधानसभेबरोबरच जिल्हा परिषद, महापालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत.

Kolhapur MNS : धडक आंदोलनांमुळे राज्य तसेच इतरत्र प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) कोल्हापुरात अठरा वर्षांची वाटचाल केली असली तरी अजूनही अस्तित्वासाठी लढा द्यावा लागत आहे. स्थानिक पातळीवर ताकदीचे नेतृत्व लाभले नसल्याने शहर वगळता पक्षाची प्रतिमा निर्माण होऊ शकलेली नाही.

त्यात पक्ष म्हणून एकत्रित वाटचाल न करता विविध विभागांनी स्वतंत्रपणे वाटचाल केल्याने दुफळी जाणवत होती. ग्रामीण भागात पदाधिकारी निवडीत दुर्लक्ष झाल्याचे जाणवते. या पार्श्‍वभूमीवर गेल्या वर्षभरापासून मात्र संघटनात्मक बांधणीसाठी प्रयत्न होताना दिसत असून, आगामी निवडणुकांमध्ये (Upcoming Elections) त्याची चुणूक पाहायला मिळेल, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.

Kolhapur MNS
Sangli Loksabha: सांगलीत शिवसेना जिंकली, हरली पण वाढली नाही; 'मातोश्री'वरूनही मिळालं नाही बळ?

काही निवडक शहरात अस्तित्व पाहायला मिळणाऱ्या मनसेने कोल्हापुरातही सुरुवात केली; पण त्याला गती मिळालेली नाही. कोणत्या तरी निमित्ताने पुणे, मुंबईतील वरिष्ठांचा दौरा असल्यानंतर पदाधिकारी, कार्यकर्ते दिसतात. यापूर्वीच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक, त्यात झालेले वाद, त्यातून निर्माण झालेले गट-तट, प्रत्येक गटाचा सवतासुभा, असा सारा प्रवास मनसेने १८ वर्षांत केला आहे. अशा येथील अस्थिर वातावरण असलेल्या पक्ष संघटनेकडून फारशी अपेक्षाही नाही. अपवाद शहरातील संघटना आहे.

येथे गट-तट असले तरी विविध प्रश्‍नांसाठी या गटांनी आपापल्या पातळीवर आंदोलने तसेच विविध उपक्रम राबविले असल्याने पक्षाचे नाव चर्चेत राहिले होते. पण, यातून पक्षाला निवडणुकांमध्ये लाभ घेता आलेला नाही, हे स्पष्ट दिसते. महापालिकेच्या गेल्या सभागृहात एकमेव नगरसेवक होते. त्याशिवाय काही नगरपालिकांमध्येही नगरसेवक निवडून आले. सहकार, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, पंचायत समितीत प्रभाव दाखविता आलेला नाही. सध्या विद्यार्थी, महिला, शिक्षक विभागाचे काम सुरू आहे. त्यांच्याकडून पक्षाच्या प्रतिमेप्रमाणे धडक आंदोलनांचा अभाव जाणवत आहे.

Kolhapur MNS
सातारा काँग्रेसला सोडल्यास लढू; 'या' बड्या नेत्यानं दर्शवली लोकसभा लढवण्याची तयारी, महायुतीसमोर आव्हान!

लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली असून, यापुढे विधानसभेबरोबरच जिल्हा परिषद, महापालिका अशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत तटस्थ भूमिका घेतली होती. सध्या अजून निर्णय झालेला नाही. स्थानिक पातळीवर पक्षाची ताकद दाखवून दिलेली नसल्याने लोकसभेसारख्या निवडणुकीत येथे फारसा विचार केला जात नसल्याची स्थिती आहे. येथील पक्षाची स्थिती लक्षात घेता शहर, जिल्ह्याच्या कार्यकारिणीवर लक्ष दिले जात आहे. वर्षभरात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे संघटक बाळासाहेब शेडगे, संपर्कप्रमुख जयराज लांडगे यांच्या माध्यमातून पक्ष संघटनेची बांधणी सुरू केली आहे.

Kolhapur MNS
Sangli Lok Sabha : 'सांगली'साठी विश्‍वजित कदमांसह प्रदेश नेत्यांची कसोटी; शिवसेनेपुढे न झुकण्यावर काँग्रेस ठाम

जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले, शहराध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली नवीन पदाधिकारी निवडी केल्या जात आहेत. शहरात प्रभाग तिथे शाखा स्थापन करून तळातून कार्यकर्ते, पदाधिकारी उभे करण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक प्रभागात एक शाखा, शाखाप्रमुख असून, उपशहर प्रमुखांच्या नेतृत्वाखाली काही प्रभाग सोपवून त्यांच्याकडून संघटना बांधणीचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी वरिष्ठांकडून सातत्याने बैठका घेऊन नियोजनही केले जात आहे.

Kolhapur MNS
माझं वय झालं म्हणता, मग तुम्ही तर कशाला मैदानात उतरता? मंडलिकांचा पवारांना थेट सवाल अन् 2009 निवडणुकीत वय ठरलं कळीचा मुद्दा!

दृष्टिक्षेपात...

  • पक्षाची प्रतिमा निर्माण करणे आवश्‍यक

  • नवीन उद्दिष्ट ठेवून वाटचाल हवी

  • नवीन कार्यकर्त्यांना जोडायला हवे

सक्षम पदाधिकारीच गरजेचे

स्थानिक पातळीवरील तळागाळापर्यंत पक्षाला पोहोचविण्यासाठी सक्षम शाखाप्रमुखांपासून विविध पदाधिकारी आवश्‍यक आहेत. त्यासाठी वरिष्ठांनी लक्ष घातले तर पक्षाची ध्येयधोरणे शेवटपर्यंत पोहोचविण्यासाठी मदत होणार आहे. तसेच पक्ष म्हणून साऱ्यांना एकत्र आणण्याची किंवा गटतट करणाऱ्यांबाबत योग्य निर्णय घेतले गेले तरच पक्षात एकसंधपणा दिसेल व नागरिकांनाही विचार करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.