Ravindra Chavan Narendra Modi
Ravindra Chavan Narendra Modiesakal

Ravindra Chavan : 'मोदी मॅजिक काय आहे, हे विरोधकांना दाखवून द्या आणि मोबाईल चार्ज करावा लागतो तसं लोकांना चार्ज करा'

नरेंद्र मोदी हे भाजपमध्ये १५ वर्षे प्रचारक होते. त्या माध्यमातून देशभर फिरून लोकांच्या समस्या जाणून घेतल्या.
Published on
Summary

मोदी मॅजिक काय आहे, हे आता विरोधकांना दाखवून द्या. त्यांच्याशिवाय देशाला पर्याय नाही. मोबाईल चार्ज करावा लागतो तसे लोकांना चार्ज करा, असे आवाहन चव्हाण यांनी केले.

रत्नागिरी : भावनिक आवाहन करून जनतेची सहानुभूती मिळवण्याचे काम करणाऱ्या विरोधकांनी केंद्र शासनाच्या योजनांच्या माध्यमातून १० वर्षांमध्ये कोकणाला काय मिळवून दिले ते सांगावे; परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी गेल्या दहा वर्षांमध्ये सर्व घटकांचे दरडोई उत्पन्न वाढवण्यासह देशाला वेगळ्या उंचीवर नेण्याचे काम केले. नरेंद्र मोदी हे एक मॅजिक असून, मोदी यांच्याशिवाय देशाला पर्याय नाही. राहिलेल्या ३५ दिवसांमध्ये आपल्याला प्रचंड मेहनत करून घराघरांत जाऊन मोदी यांचे कार्य पटवून द्यायचे आहे, असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी केले.

सावरकर नाट्यगृहात आयोजित बूथ कार्यकर्ता सुपर वॉरिअर्स संमेलनात ते बोलत होते. या वेळी आमदार नीतेश राणे, लोकसभा समन्वयक अतुल काळसेकर, भाजप (BJP) जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, संघटनमंत्री शैलेंद्र दळवी आदी उपस्थित होते. रवींद्र चव्हाण म्हणाले, ‘‘लोकसभा मतदारसंघातून महायुतीचा उमेदवार निवडून देत नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करायचे आहे. त्यासाठी आपल्याला प्रचंड मेहनत करावी लागणार आहे.

Ravindra Chavan Narendra Modi
Satara Lok Sabha : 'मविआ'च्या उमेदवारीचा कऱ्हाडच राहणार केंद्रबिंदू; कोणाला मिळणार उमेदवारी? उत्सुकता शिगेला

आपल्या भागांमध्ये, गावामध्ये, वस्तीत, शहरामध्ये प्रत्येक व्यक्तीपर्यंत आणि परिवारापर्यंत पोहोचण्याचा संकल्प तुम्हाला करायचा आहे. विरोधकांच्या भावनिक आवाहनाला कोणी बळी पडू नका. भावनिक आवाहन करणाऱ्यांनी कोकणासाठी काय केले, केंद्राच्या मदतीने काय मिळवून दिले, ते जनतेला सांगावे.’’

मोदी काय आहे, हे जनतेपर्यंत गेले पाहिजे. नरेंद्र मोदी हे भाजपमध्ये १५ वर्षे प्रचारक होते. त्या माध्यमातून देशभर फिरून लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर संघटनात्मक पदाधिकारी झाले. गुजरातचे मुख्यमंत्री आणि आता देशाचे पंतप्रधान आहेत. मोदी मॅजिक काय आहे, हे आता विरोधकांना दाखवून द्या. त्यांच्याशिवाय देशाला पर्याय नाही. मोबाईल चार्ज करावा लागतो तसे लोकांना चार्ज करा, असे आवाहन चव्हाण यांनी केले.

Ravindra Chavan Narendra Modi
Hatkanangle Lok Sabha : 'चिन्हात' अडकला पाठिंब्याचा निर्णय; 'स्वाभिमानी'च्या राजू शेट्टींची कोंडी, 'मशाल'वर शिवसेना ठाम

विविध योजनांमुळे सामान्यांना फायदा

दहा वर्षांपूर्वी विजेचे उत्पादन ५२ टक्के होते, आज ते ८५ टक्के झाले आहे. देशात रेल्वेचे जाळे पसरवण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. दोन्ही जिल्ह्यांत रेल्वे स्थानकांना नवा लूक देण्यासाठी १०६ कोटी दिले. साडेपाच कोटी रस्ते दुरुस्तीसाठी दिले. केंद्राच्या १८०० योजनांच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य शासन काम करत असून, त्याचा सामान्यांना फायदा होत आहे. वर्षाला शेतकऱ्यांना सहा हजार रुपये खात्यात पडत आहेत. गरिबांसाठी मोफत धान्ययोजना सुरू आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.