बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी शिवसेना स्थापन केली, त्यांचेच पुत्र आज हिंदुत्व संपवून टाकताहेत; राणेंचा ठाकरेंवर हल्ला
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी शिवसेना स्थापन केली. त्यांचेच पुत्र उद्धव ठाकरे मात्र हिंदुत्व संपवून टाकत आहेत.
राजापूर : ‘लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी कोणताही विकास वा रोजगार निर्मिती न करता केवळ लोकांची माथी भडकविण्याचे काम केले. त्यामुळे या निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार निश्चितपणे निवडून येईल. पक्ष नेतृत्वाने आपणाला उमेदवार म्हणून संधी दिल्यास सिंधुदुर्गच्या धर्तीवर रत्नागिरीचा निश्चितच विकासात्मक कायापालट करू,’ असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी करून लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
लोकसभा निवडणुकीचा अनुषंगाने तालुक्यातील ओणी येथे आयोजित भाजपच्या (BJP) मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी भाजपचे नेते आणि माजी खासदार नीलेश राणे, लोकसभा मतदारसंघ प्रमुख प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष सावंत, माजी आमदार बाळ माने, भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस शिल्पा मराठे, उल्का विश्वासराव, रवींद्र नागरेकर यांसह अन्य मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते.
मंत्री राणे म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास होत असून, जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये भारताने लक्षवेधी प्रगती करीत आहे. केंद्र शासनाच्या विविध योजनांचा सर्वसामान्यांना लाभ मिळत आहे. कोरोना काळात आणि त्यानंतरही सर्वसामान्यांसह देशाची आर्थिक घडी बसविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महत्त्वपूर्ण काम केले. मात्र, कोरोना काळामध्ये उद्धव ठाकरे यांनी औषध घोटाळे केल्याचे बोलले जात आहे. त्याची चौकशीही सुरू आहे. त्यामध्ये त्यांच्यासह आदित्य ठाकरे जेलमध्ये जातील. केंद्रामध्ये सत्ताधारी असताना काँग्रेसने देशाचा विकास साधलेला नाही. त्यामुळे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार नाही.
याप्रसंगी राणे यांनी ठाकरे सेनेला लक्ष्य करतानाच लोकसभा मतदारसंघामध्ये विकासकामे न करता महामार्गावरील टोल आकारणाची ठेका स्वतःच्या मुलाच्या नावावर घेतल्याचे सांगितले. तसेच हा ठेका त्यांनी सर्वसामान्यांना का दिला नाही, गेल्या दहा वर्षांमध्ये शैक्षणिक, वैद्यकीय सुविधा, रोजगार निर्मिती न करणारे खासदार, आमदार नेमके कशासाठी, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार निश्चितपणे निवडून येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.’ या वेळी माजी खासदार श्री. राणे, श्री. जठार, श्री. माने, श्री. सावंत यांची भाषणे झाली. श्री. नागरेकर यांनी प्रस्तावनेत मतदारसंघाचा थोडक्यात आढावा घेतला.
ठाकरे हिंदुत्व संपवत आहेत
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्वासाठी शिवसेना स्थापन केली. त्यांचेच पुत्र उद्धव ठाकरे मात्र हिंदुत्व संपवून टाकत आहेत. देण्याची नाही, तर घेण्याची वृत्ती असलेल्या उद्धव ठाकरे यांचे शिवसेना वाढविण्यासाठी योगदान काय, असा आरोपही मंत्री राणे यांनी ठाकरे यांच्यावर केला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.