Hatkanangle Loksabha Constituency Raju Shetti
Hatkanangle Loksabha Constituency Raju Shettiesakal

Hatkanangale Lok Sabha : पाठिंब्याबाबत उद्धव ठाकरेंनी 'तो' शब्द फिरवला; राजू शेट्टींचा आरोप

सांगलीमध्ये वसंतदादांचे घराणे संपवण्याचा डाव सुरू आहे.
Published on
Summary

‘शिवसेनेसोबत गद्दारी केलेल्या धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांना पराभूत करण्यासाठी मला पाठिंबा दिला पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची भूमिका होती.'

कोल्हापूर : ‘पाठिंबा देण्याबाबत शिवसेना नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपला शब्द फिरवला आहे. मशाल चिन्हावर निवडणूक लढवणे म्हणजे स्वाभिमानी शेतकरी पक्ष शिवसेनेत (Shiv Sena) विलीन करण्यासारखे आहे. त्यामुळे आपण याला नकार दिला. जमीन हस्तांतरणाबाबत केलेल्या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. मात्र, हा कायदा करण्याचे पाप हे महाविकास आघाडीचेच असल्याची टीका माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केली.

Hatkanangle Loksabha Constituency Raju Shetti
उदयनराजेंविरोधात शरद पवारांनी बाहेर काढला हुकमी एक्का; संघर्ष योद्ध्यालाच रिंगणात उतरविण्याचा घेतला निर्णय

प्रेस क्लब येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दरम्यान, सांगलीमध्ये वसंतदादांचे घराणे संपवण्याचा डाव सुरू आहे. गेल्या निवडणुकीत बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी एक सभा घेतली असती तर विशाल पाटील विजयी झाले असते; पण तसे न करता ते तिकडे गेले नाहीत, असेही शेट्टी म्हणाले.

शेट्टी म्हणाले, ‘शिवसेनेसोबत गद्दारी केलेल्या धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) यांना पराभूत करण्यासाठी मला पाठिंबा दिला पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची भूमिका होती. यातूनच उद्धव ठाकरे किंवा संबंधितांसोबत बैठक आणि चर्चा झाली. ही चर्चा सुरू असताना ठाकरे यांना साखर कारखानदार भेटले असतील. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी शब्द फिरवला आहे.

Hatkanangle Loksabha Constituency Raju Shetti
Sangli Lok Sabha : सांगलीतून विशाल की चंद्रहार पाटील? तडजोडीस उद्धव ठाकरेंचा नकार, 'मविआ'कडून आज घोषणा

भाजपविरोधात मतांची विभागणी होईल, यासाठी शेट्टींना पाठिंबा दिल्यास फायद्याचे ठरू शकेल, ही शिवसेना कार्यकर्त्यांची भूमिका होती. त्यांनी मशाल चिन्हावर निवडणूक लढवण्याचे आवाहन केले; पण यामुळे आमची चळवळ संपून जाईल, यासाठी ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतली आहे. डी. सी. पाटील हे भाजपचे सदस्य असल्याचे सांगून शेट्टी म्हणाले, ‘धैर्यशील माने यांची स्पर्धा वंचितच्या उमेदवारासोबतही असू शकते. त्यांची स्पर्धा त्यांच्यासोबत.’

Hatkanangle Loksabha Constituency Raju Shetti
Satara Lok Sabha : साताऱ्याचा पुढील खासदार महायुतीचाच आणि मोदींचा हात बळकट करणारा असेल - शंभूराज देसाई

माझ्यामुळेच उद्धव ठाकरे नेते झाले...

‘महाविकास आघाडीची स्थापना झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे नेतेपद देण्यासाठी आपण सूचक आणि छगन भुजबळ हे अनुमोदक होते. माझ्यामुळेच ठाकरे नेते झालेत हे त्यांनी विसरू नये’, असेही शेट्टी म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()