Kolhapur Lok Sabha Satej Patil
Kolhapur Lok Sabha Satej Patilesakal

Kolhapur Lok Sabha : 'जसे वार येतील त्याच्या दहापटीने छत्रपती शिवराय आणि शाहू महाराजांचे मावळे वार करतील'; सतेज पाटलांचा इशारा

शाहू महाराज यांचे नाव पुसण्यासाठीचे काम विरोधकांकडून केले जात आहे.
Published on
Summary

'कोल्हापुरातील सर्व पेठांनी शाहू महाराज यांना सहकार्य करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे जे पेठांमध्ये होते तेच महाराष्ट्रात घडते.'

कोल्हापूर : ‘आपल्या राजकीय भविष्याचा विचार न करता २०१९ च्या निवडणुकीत तुम्हाला केलेल्या मदतीचे उपकार तुम्ही विसरणार असाल तर कोल्हापूरच्या जनतेला विसरायला तुम्हाला किती वेळ लागणार,’ अशी टीका आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांचे नाव न घेता केली. तर कोल्हापुरातील सर्व पेठांनी शाहू महाराज यांना सहकार्य करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे जे पेठांमध्ये होते तेच महाराष्ट्रात घडते, असेही पाटील यांनी नमूद केले.

महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) लोकसभेचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shahu Maharaj) यांच्या प्रचारार्थ दैवज्ञ बोर्डिंग येथे झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. सतेज पाटील म्हणाले, ‘शाहू महाराजांना मिळालेल्या उमेदवारीचे सोने करण्याची जबाबदारी आपणा सर्वांची आहे. कोल्हापूर आणि शाहू महाराजांचे अतूट नाते आहे. हे नाते अधिक दृढ केले पाहिजे. कोल्हापूरची अस्मिता प्रचंड मत्ताधिक्याने लोकसभेत पाठवूया.

Kolhapur Lok Sabha Satej Patil
Satara Lok Sabha : साताऱ्याचा पुढील खासदार महायुतीचाच आणि मोदींचा हात बळकट करणारा असेल - शंभूराज देसाई

कोल्हापुरातील पेठा या कोल्हापूरचा आत्मा आहेत. एकदा पेठांनी एखाद्याचा कार्यक्रम करायचे ठरवले की परफेक्ट कार्यक्रम होतो. त्यामुळे या निवडणुकीत शहरातील पेठांची भूमिका महत्त्वाची आहे. रविवारी महासैनिक दरबार हॉल या ठिकाणी झालेल्या मेळाव्यादरम्यान खासदार संजय मंडलिक यांच्या विरोधात मी एक वाक्य उच्चारले होते. मात्र, लागलीच त्यांनी माझ्यावरही टीका करायला सुरुवात केली आहे. मात्र, जसे वार येतील त्याच्या दहापटीने छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांचे मावळे वार करतील.’

शाहू महाराज म्हणाले, ‘पदवीधर झाल्यानंतर तरुणांना एक लाख रुपये देण्याचा अजेंडा आहे. शहरात रस्ते सुधारणा, पाणीपुरवठा, आरक्षणाची पन्नास टक्‍क्‍यांची मर्यादा काढून टाकली जाणार आहे. पुरोगामी विचारांचा पहिल्यांदाच असा जाहीरनामा तयार केला आहे. त्यानुसार हे सर्व प्रश्‍न सोडवले जाणार आहेत.’

Kolhapur Lok Sabha Satej Patil
Hatkanangale Lok Sabha : पाठिंब्याबाबत उद्धव ठाकरेंनी 'तो' शब्द फिरवला; राजू शेट्टींचा आरोप

माजी आमदार मालोजीराजे छत्रपती म्हणाले, ‘शाहू महाराज यांचे नाव पुसण्यासाठीचे काम विरोधकांकडून केले जात आहे. देशाची आणि राज्याची परिस्थिती पाहिली तर लोकशाही टिकते की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे..’ यावेळी आमदार जयश्री जाधव, संजय पवार, विजय देवणे, आर. के. पोवार, वसंतराव मुळीक, अशोक पोवार, रमेश मोरे, हिंदकेसरी विनोद चौगले, चंद्रकांत भोसले, शिवाजी ढवाण, माजी नगरसेवक रवी आवळे, दीपक गौड, राजेंद्र ठोंबरे, संभाजी जगदाळे, दिलीप पोवार, भारती पोवार, आर. डी. पाटील, आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()