'..जर मिठाचा खडा पडला, तर कुणाच्या बापाचं ऐकायचो नाही'; अजितदादांच्या भाषणाचा स्टेटस् ठेऊन सामंतांचा कोणाला इशारा?
शिवसेनेकडून धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवण्यास किरण ऊर्फ भैय्या सामंत इच्छूक आहेत.
रत्नागिरी : ...जर मिठाचा खडा पडला, तर कुणाच्या बापाचं ऐकायचो नाही...या अजित पवार (Ajit Pawar) यांच्या भाषणातील वाक्यांचा स्टेटस् किरण ऊर्फ भैय्या सामंत यांनी ठेवल्याने पुन्हा एकदा राजकीय चर्चेला हवा मिळाली आहे. हा इशारा कुणासाठी याची चर्चा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Constituency) जोरदार सुरू आहे.
दोन दिवसांत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार तरी महायुतीचा रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा कायम आहे. अजून महायुतीच्या उमेदवाराचा चेहरा मतदारांपुढे गेलेला नाही. दोन्ही पक्षांनी या जागेवर दावा केल्याने हा विषय ताणला असून तो प्रतिष्ठेचा झाला आहे. भाजप कमळावरचा उमेदवार असेल असे स्पष्ट करत प्रचाराला सुरुवात केली आहे.
तर, शिवसेनेकडून धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवण्यास किरण ऊर्फ भैय्या सामंत इच्छूक आहेत. महायुतीमधून शिवसेनेकडून किरण सामंत (Kiran Samant) यांचे नाव चर्चेत असताना, या मतदारसंघावर भाजपाकडून दावा केला आहे. शिवसेनेचा हा मतदारसंघ आहे. सेनेला वातावरणही चांगले असल्याचा दावा केला जात असून भाजप माघार घेण्यास तयार नसल्याने शिवसेनेमध्ये प्रचंड असंतोष आहे.
या घडामोडी सुरू असताना यापूर्वीही किरण सामंत यांच्या स्टेटसने मतदारसंघात हलचल निर्माण केली होती. त्याचाही कानोसा विविध राजकीय पक्षांकडून घेतला जात होता. काल रात्री किरण सामंत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणाचा काही भाग स्टेटस् म्हणून ठेवला आहे. ...जर मिठात खडा पडला तर आमदारकीच्या वेळेला मी कुणाच्या बापालाही ऐकणार नाही.. हे अजित पवारांच्या बारामती मतदारसंघातील इशारेवजा भाषण वापरून किरण सामंतांनी नेमका कुणाला इशारा दिला, याचीच जोरदार चर्चा मतदारसंघात सुरू आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.