Dhananjay Mahadik Sanjay Mandlik
Dhananjay Mahadik Sanjay Mandlikesakal

खासदार मंडलिक, महाडिकांना 'ती' वक्तव्ये पडली महागात! 'मविआ'ने निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली तक्रार

शाहू छत्रपती हे कोल्हापूर संस्थानचे खरे वारस आहेत.
Published on
Summary

खासदार मंडलिक यांनी दिशाभूल करणारी वक्तव्ये केल्याने सामाजिक उपद्रव निर्माण होण्याची शक्यता आहे.

कोल्हापूर : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi), इंडिया आघाडीने खासदार प्रा. संजय मंडलिक आणि खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्याविरोधात निवडणूक अधिकारी यांच्याकडे तक्रार दिली. अवमानकारक वक्तव्याबद्दल महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शहर सचिव रघुनाथ कांबळे यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी यांच्‍याकडे केली.

Dhananjay Mahadik Sanjay Mandlik
Satara Lok Sabha : 'दुसऱ्यांचे पक्ष फोडून बालेकिल्ला होत नसतो'; शशिकांत शिंदेंचे शिवेंद्रराजेंना जोरदार प्रतिउत्तर

कांबळे यांनी तक्रार अर्जात म्हटले आहे की, नेसरी येथील सभेत खासदार मंडलिकांनी ‘आताचे श्रीमंत शाहू छत्रपती (Shahu Maharaj) हे खरे वारसदार नाहीत. ते कोल्हापूरचे आहेत का? ते दत्तक आले आहेत’, असे वक्तव्य केले. श्रीमंत शाहू छत्रपती हे हिंदू दत्तक व निर्वाह अधिनियम तसेच कोल्हापूर संस्थानच्या दत्तक संबधीच्या कायद्यान्वये, कायदेशीरदृष्ट्या कोल्हापूर संस्थानामध्ये दत्तक आले आहेत.

भारतातील प्रचलित कायद्याप्रमाणे दत्तक मुलाच्या पोटी जन्मलेल्या मुलाप्रमाणे स्थान दिले आहे. त्यामुळे शाहू छत्रपती हे कोल्हापूर संस्थानचे खरे वारस आहेत. मंडलिक हे देशाच्या सर्वोच्च सभागृह असलेल्या लोकसभेचे सभासद आहेत. अशा सभागृहाचे सभासद व प्राध्यापक असलेल्या खासदार मंडलिक यांनी दिशाभूल करणारी वक्तव्ये केल्याने सामाजिक उपद्रव निर्माण होण्याची शक्यता आहे. शत्रुत्व वाढविण्यास, समाजामध्ये एकोपा ठरण्यास बाधा ठरेल, अशी कृती केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.

Dhananjay Mahadik Sanjay Mandlik
Sangli Lok Sabha : विशाल पाटलांना उमेदवारी डावलली; मिरज काँग्रेस कमिटी बरखास्त, 'काँग्रेस' फलकाला फासला रंग

मतदारांना दाखविले महाडिकांनी आमिष

नेसरी येथील महायुतीचे उमेदवार मंडलिक यांच्या प्रचारार्थ भाजपच्या मेळाव्यात राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी मंडलिकांना मताधिक्य देणाऱ्या तालुक्याला पाच कोटी विकास निधी देण्याची घोषणा केली होती. या वक्तव्याच्या विरोधात शिवसेना शहरप्रमुख सुनील मोदी यांनी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्याकडे तक्रार केली आहे. महाडिकांची घोषणा ही लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५१ चे कलम १२३ मध्ये ‘लाचलुचपत’ या शब्दाची व्याख्या दिली आहे. त्या व्याख्येमध्ये तंतोतंत समाविष्ठ होत असल्याचे निवडणूक आयोग अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.