Hatkanangale Lok Sabha MLA Prakash Awade
Hatkanangale Lok Sabha MLA Prakash Awadeesakal

Hatkanangale Lok Sabha : ..अखेर आमदार प्रकाश आवाडेंची तलवार म्यान; मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर मानेंना जाहीर केला पाठिंबा

महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे काल कोल्हापुरात येणार होते.
Published on
Summary

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर हातकणंगलेतून निवडणूक लढवण्याची घोषणा सुरुवातीला राहुल आवाडे यांनी केली.

कोल्हापूर : कोणत्याही परिस्थितीत हातकणंगले लोकसभा (Hatkanangale Lok Sabha) मतदारसंघातून निवडणूक लढवण्यावर ठाम असलेले भाजपचे सहयोगी आमदार प्रकाश आवाडे (MLA Prakash Awade) यांची तलवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीनंतर म्यान झाली. दोन दिवसांपूर्वी शिंदे यांच्या भेटीनंतरही लढण्यावर ठाम असलेल्या आवाडे यांनी आज त्यांच्या भेटीनंतरच लोकसभा लढवणार नसल्याचे जाहीर केले. रुईकर कॉलनी येथील आवाडे यांच्या निवासस्थानी ही भेट झाली.

दरम्यान, भविष्यात आवाडे यांचे पुत्र राहुल यांना राज्याच्या राजकारणात सन्मानाचे पद देण्याचा ‘शब्द’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिल्याचे समजते. त्यातून लोकसभेनंतर राहुल यांची विधान परिषदेवर वर्णी लागण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर हातकणंगलेतून निवडणूक लढवण्याची घोषणा सुरुवातीला राहुल आवाडे यांनी केली. त्यासाठी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.

Hatkanangale Lok Sabha MLA Prakash Awade
Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha : उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री काळ म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कलंक; राणेंची सडकून टीका

पण, ही घडामोड पुढे सरकली नाही. तोपर्यंत आठ दिवसांपूर्वी आमदार प्रकाश आवाडे हे हातकणंगलेतून लोकसभा निवडणूक लढतील, अशी घोषणा राहुल यांनीच आमदार आवाडे यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषदेत केली. त्यांच्या ताराराणी आघाडीच्या वतीने पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना बसवण्यासाठी आपण रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले. आवाडे यांच्या या अचानक बंडखोरीने महायुतीतील नेतेही आवाक्‌ झाले होते.

त्यानंतर शनिवारी (ता. १३) जिल्ह्याच्या दौऱ्यावर अचानक आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आवाडे व त्यांच्या कुटुंबीयांनी भेट घेतली. या भेटीनंतरही आवाडे लोकसभा लढवण्यावर ठाम होते. भाजपचे सहयोगी सदस्य असूनही आवाडे लढतात, यामागे भाजप नेत्यांची ताकद असल्याचा संशय बळावू लागला. शिंदे यांनी कोल्हापूर दौऱ्यात दोन्ही मतदारसंघांचा आढावा घेतला असला तरी हातकणंगलेबाबत आवाडे यांच्या भूमिकेबाबात त्यांनी अनेकांशी वैयक्तिक चर्चा केली. त्यासाठी मध्यरात्री ते ‘जनसुराज्य’चे आमदार विनय कोरे यांच्या भेटीला वारणेला गेले, तेथून शिरोळचे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचीही भेट घेतली.

Hatkanangale Lok Sabha MLA Prakash Awade
भाजपकडून उमेदवारी जाहीर होण्याआधीच उदयनराजेंनी भरली अनामत रक्कम; 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही आवाडे ठाम राहिल्याने यांची गंभीर दखल भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. फडणवीस यांनी काल (ता. १४) डॉ. कोरे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या चर्चेनंतर डॉ. कोरे आज पहाटे चारच्या सुमारास थेट आवाडे यांच्या रुईकर कॉलनीतील घरात दाखल झाले. त्यांनी आवाडे यांचे फडणवीस यांच्याशी फोनवरून बोलणे करून दिले. या चर्चेत मुख्यमंत्री शिंदे तुमची आज भेट घेतील, असा शब्द फडणवीस यांनी दिला. त्यानंतर आवाडे हे लढण्याच्या निर्णयापासून दूर झाले.

महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे काल कोल्हापुरात येणार होते. रॅलीला जाण्यापूर्वी शिंदे विमानतळावरून थेट आवाडे यांच्या रुईकर कॉलनीतील निवासस्थानी गेले. यावेळी त्यांच्यासोबत मंत्री शंभुराज देसाई, माजी मंत्री विजय शिवतारे, डॉ. कोरे व आमदार रामदास कदम होते. तर आवाडे कुटुंबीयांपैकी इचकरंजीच्या माजी नगराध्यक्षा किशोरी आवाडे, उत्तम आवाडे, राहुल आवाडे व स्नुषा मौसमी उपस्थित होत्या. या भेटीत शिंदे यांनी समजूत काढल्यानंतर आवाडे यांनीही आपली तलवार म्यान केली. घरातून शिंदे यांच्या गाडीतूनच आवाडे रॅलीच्या ठिकाणी व तेथून माने यांचा अर्ज दाखल करण्यासाठी दाखल झाले.

राहुल यांच्याशीच चर्चा

मुख्यमंत्री शिंदे यांचे आगमन झाल्यानंतर आवाडे कुटुंबीयांच्यावतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर शिंदे यांनी आमदार आवाडे यांच्यापेक्षा त्यांचे पुत्र राहुल यांच्याशीच जास्त वेळ चर्चा केली. बंद खोलीत या दोघांत दोनवेळा चर्चा झाली. या चर्चेवेळी आमदार आवाडे हे बाहेरच होते; पण राहुल व मुख्यमंत्री शिंदे यांच्यातील चर्चेचा तपशील समजला नाही.

Hatkanangale Lok Sabha MLA Prakash Awade
Sangli Lok Sabha : विशाल पाटलांच्या बंडाच्या पवित्र्यामुळे काँग्रेस सावध; विश्‍वजित, पृथ्वीराज, सावंतांना नागपूरला पाचारण

खासदार मानेंसाठी काम करणार

‘लोकसभेबरोबरच आगामी काळात होणाऱ्या विधानसभेपासून नगरपालिकांपर्यंतच्या निवडणुकांसाठी ही महायुती अभेद्य राहिली पाहिजे. उमेदवारी अर्ज न भरता हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांच्यासाठी काम करण्याचे ठरवले आहे. आम्ही तुमच्यासोबत आहोत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांचे नेतृत्व व टीमवर्क गरजेचे आहे. म्हणूनच त्याला बळ देण्यासाठी या निवडणुकीत माझी उमेदवारी भरणार नाही हे स्पष्ट करतो’, असे आमदार प्रकाश आवाडे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.