Hatkanangale Lok Sabha Jayant Patil
Hatkanangale Lok Sabha Jayant Patilesakal

Jayant Patil : भाजपला '400 पार' राहू देत '200 पार' होताना नाकीनऊ येईल; आमदार जयंत पाटलांनी लगावला टोला

रयतेसाठी राजा काय करू शकतो हे राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या कार्यातून सतत दाखवून दिले आहे.
Published on
Summary

महायुतीच्या उमेदवारांसाठी दोनवेळा कोल्हापुरात यावे लागणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आता वारंवार या ठिकाणी येण्याची वेळ येणार आहे.

कोल्हापूर : ‘भाजपचा नारा चारशे पार असला तरी, या निवडणुकीत त्यांना दोनशे पार करतानाही नाकीनऊ येणार आहे’, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) चे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील (Jayant Patil) यांनी येथे प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना लगावला.

पाटील यांच्या उपस्थितीत हातकणंगले लोकसभा (Hatkanangale Lok Sabha) मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील-सरूडकर (Satyajit Patil-Sarudkar) यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. त्यानंतर पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रसिध्दीमाध्यमांशी संवाद साधला.

Hatkanangale Lok Sabha Jayant Patil
Kolhapur Lok Sabha : 'कोल्हापुरात आज मी नव्हे, तर रयतेनेच माझा उमेदवारी अर्ज दाखल केला'; शाहू महाराजांना विजयाचा विश्वास

पाटील म्हणाले, ‘भाजप (BJP) महायुतीला ‘चारशे पार’ राहू देत ‘दोनशे पार’ होताना नाकीनऊ येईल, असे वातावरण महाराष्ट्रात फिरल्यानंतर दिसत आहे. जनता मतदानाची वाट पाहात असून, विरोधी आघाडीला भरभरुन प्रतिसाद देत आहे. जनतेचे प्रश्‍न सोडविण्यात केंद्र व राज्य सरकार अपयशी ठरले आहे, त्यामुळे सत्ताधारी महायुतीला फार चांगले वातावरण महाराष्ट्रात दिसत नाही.’

Hatkanangale Lok Sabha Jayant Patil
संविधानाचा ढाचाच काँग्रेसने बदलला, स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत 107 वेळी केली घटनादुरुस्ती; भाजप प्रवक्ते माधव भांडारींचा आरोप

कोल्हापूरची निवडणूक ही ‘राजा विरुध्द रयत’ अशी होत आहे, या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानाबाबत विचारले असता पाटील म्हणाले,‘ असा फरक करणे चुकीचे आहे. रयतेसाठी राजा काय करू शकतो हे राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या कार्यातून सतत दाखवून दिले आहे. त्यांच्याच विचारांवर श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांचे कार्य सुरू आहे.’

Hatkanangale Lok Sabha Jayant Patil
'एक रुपयाचा जरी भ्रष्टाचार सिद्ध झाला, तर राजकीय जीवनातून निवृत्ती घेईन'; शशिकांत शिंदेंचं मोठं विधान

ते पुढे म्हणाले,‘ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना शिवसेना, भाजप व राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर करताना त्रास होत आहे. अजूनही त्यांचे उमेदवार निश्‍चित होत नाहीत. साताऱ्याची उमेदवारी आज जाहीर झाली. एकंदरीत महायुतीची परिस्थिती पाहिल्यास ती बरी नसल्याचे दिसत आहे. महायुतीच्या उमेदवारांसाठी दोनवेळा कोल्हापुरात यावे लागणाऱ्या मुख्यमंत्र्यांना आता वारंवार या ठिकाणी येण्याची वेळ येणार आहे. सांगलीच्या जागेबाबत कॉंग्रेस व शिवसेना (ठाकरे गट) यांच्यातील वाद मिटावा, अशी आमची अपेक्षा आहे. या ठिकाणी महाविकास आघाडीचा एकच उमेदवार असावा, अशी भूमिका घेतली पाहिजे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.