PM मोदी देशाला वाहून घेतलेलं त्यागी व्यक्तिमत्त्‍व, तिसऱ्यांदा त्यांना पंतप्रधान करण्यासाठी साथ द्या : नारायण राणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे देशाला वाहून घेतलेलं त्यागी व्यक्तिमत्त्‍व आहे.
Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Narayan Rane
Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Narayan Raneesakal
Published on
Summary

‘देशासाठी अहोरात्र काम करणाऱ्या पंतप्रधान मोदी यांचा गौरव जागतिक स्तरावर होत आहे. त्यांच्या कार्याचे कौतुक अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसह अन्य विकसित राष्ट्राने केली आहे.'

चिपळूण : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे देशाला वाहून घेतलेलं त्यागी व्यक्तिमत्त्‍व असून, स्वच्छ प्रतिमेचे नेतृत्व आहे. या अशा पंतप्रधानांवर इंडिया आघाडीचे नेते टीका करतात. भाजप एनडीए आघाडीचे ३०३ खासदार असून, काँग्रेसकडे विरोधी पक्ष नेतेपद मिळवण्या इतके खासदार देखील नाहीत. उद्धव ठाकरे यांचे ५ खासदार, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे ३ खासदार असून, या नेत्यांचे आता खासदारदेखील निवडून येणार नाहीत, अशी टीका केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केली.

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Narayan Rane
संविधानाचा ढाचाच काँग्रेसने बदलला, स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत 107 वेळी केली घटनादुरुस्ती; भाजप प्रवक्ते माधव भांडारींचा आरोप

सोमवारी नारायण राणे चिपळूण दौऱ्यावर आले होते. सकाळी पेढांबे येथील महायुतीच्या (Mahayuti) मेळाव्यानंतर सायंकाळी चिपळूण शहरातील राधाताई लाड सभागृहात महायुतीचा मेळावा झाला. राणे म्हणाले, ‘देशासाठी अहोरात्र काम करणाऱ्या पंतप्रधान मोदी यांचा गौरव जागतिक स्तरावर होत आहे. त्यांच्या कार्याचे कौतुक अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसह अन्य विकसित राष्ट्राने केली आहे.

विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या आपल्या देशाचा सन्मान सर्वस्तरावर होत असतानाच ४०० पार खासदार विजयी होऊन पंतप्रधान मोदी यांच्या विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण करण्यासाठी आपल्या सर्वांची साथ मिळावी. यावेळी माजी आमदार मधुकर चव्हाण, भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा चित्रा चव्हाण, उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष व माजी नगराध्यक्षा सुरेखा खेराडे आदी उपस्थित होते.

Ratnagiri Sindhudurg Lok Sabha Narayan Rane
Jayant Patil : भाजपला '400 पार' राहू देत '200 पार' होताना नाकीनऊ येईल; आमदार जयंत पाटलांनी लगावला टोला

भाजपचा जाहीरनामा

भाजपच्या जाहिरनाम्यात रोजगाराच्या संधी, महिलांचे सक्षमीकरण आणि शेतकरी यांच्यावर विशेष भर दिला आहे. तसेच उद्योजकतेवरही लक्ष दिले आहे. गेल्या दहा वर्षांत भाजपने आपल्या जाहिरनाम्यातील प्रत्येक मुद्याची हमी देऊन अंमलबजावणी केली आहे. कोरोना काळात अनेक उद्योगधंदे बंद झाले होते. उपासमारीची वेळ आली. अशा वेळी देशातील ८० कोटी लोकांना मोदींनी मोफत अन्नधान्य सुरू केले. आजही ती योजना सुरू आहे. ४ कोटी गरिबांना पक्की घरे देण्यात आली. ११ कोटी ७२ लाख शौचालये बांधली. त्यामुळे मोदी यांना पुन्हा पतंप्रधान करण्यासाठी सर्वांची साथ मिळावी, असे आवाहन राणे यांनी केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()