Madhav Bhandari Constitution
Madhav Bhandari Constitutionesakal

संविधानाचा ढाचाच काँग्रेसने बदलला, स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत 107 वेळी केली घटनादुरुस्ती; भाजप प्रवक्ते माधव भांडारींचा आरोप

देश स्वतंत्र झाल्यापासून २०१४ पर्यंत संविधानात १०७ वेळा दुरुस्ती करण्यात आली.
Published on
Summary

धर्मनिरपेक्ष हा शब्द त्यांनी संविधानात समाविष्ट केला, जो मूळचा नाही. त्यांनी आणीबाणीच्या काळात जगण्याचा अधिकारही काढून घेतला.

कोल्हापूर : ‘देश स्वतंत्र झाल्यापासून २०१४ पर्यंत संविधानात १०७ वेळा दुरुस्ती करण्यात आली. यातील ८३ दुरुस्त्या या काँग्रेसच्या (Congress) काळात झाल्या असून, यामध्ये त्यांनी संविधानाचा (Constitution) ढाचा बदलला आहे. आणीबाणीच्या काळात ४२ वी घटनादुरुस्ती करून त्यांनी जगण्याचा अधिकारही काढून घेतला होता,’ असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भांडारी (Madhav Bhandari) यांनी केले. पक्ष कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांनी प्रास्ताविक केले. यावेळी भांडारी म्हणाले, ‘भारतीय जनता पक्ष संविधान बदलणार असा कांगावा काँग्रेस करत आहे. प्रत्यक्षात त्यांनीच घटनेमध्ये दुरुस्ती करून संविधानाचा ढाचा बदलला. स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत १०७ वेळा घटनादुरुस्ती करण्यात आली. त्यातील ८३ वेळा काँग्रेसच्या काळात दुरुस्ती करण्यात आली. या काळात त्यांनी घटनेचा ढाचाच बदलला.

Madhav Bhandari Constitution
'एक रुपयाचा जरी भ्रष्टाचार सिद्ध झाला, तर राजकीय जीवनातून निवृत्ती घेईन'; शशिकांत शिंदेंचं मोठं विधान

धर्मनिरपेक्ष हा शब्द त्यांनी संविधानात समाविष्ट केला, जो मूळचा नाही. त्यांनी आणीबाणीच्या काळात जगण्याचा अधिकारही काढून घेतला. पत्रकारांना तुरुंगात डांबले. विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधने आणली. भारतीय जनता पक्षाच्या कळात जी दुरुस्ती झाली ती संविधानाच्या चौकटीत सामाजिक आशयाने करण्यात आली. भारतीय जनता पक्ष संविधानात कोणताही बदल करणार नाही. काँग्रेस फक्त कांगावा करत आहे.’

Madhav Bhandari Constitution
Kolhapur Lok Sabha : 'कोल्हापुरात आज मी नव्हे, तर रयतेनेच माझा उमेदवारी अर्ज दाखल केला'; शाहू महाराजांना विजयाचा विश्वास

भाजपच्या संकल्पपत्राबाबत ते म्हणाले, ‘भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा नाही तर तो आमचा संकल्प आहे. हे संकल्पपत्र जनतेच्या सूचना मागवून बनविण्यात आले आहे. विशेष म्हणजे २०१४ आणि २०१९ या वर्षीच्या संकल्पपत्रामध्ये कोणत्या बाबी होत्या आणि त्यातील किती पूर्ण झाल्या याचा लेखाजोखाही मांडण्यात आला आहे. अशा पद्धतीचे संकल्पपत्र अन्य कोणत्याही पक्षाचे नाही. यामध्ये कृषी, उद्योग, व्यापार, दळणवळण, सांस्कृतिक क्षेत्रात काय काम करणार याची माहिती आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला पाचव्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर नेण्याचा मार्ग या संकल्पपत्रातून दिसतो.’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()