Kolhapur Lok Sabha : कुणाच्या तरी पराभवासाठी 'ते' माझ्यासोबत आले; गौप्यस्फोट करत मंडलिक सतेज पाटलांबद्दल काय म्हणाले?
'संजय मंडलिक कुठे दिसत नाही, हे अलीकडच्या काळात कोणीतरी खोटा प्रचार करत आहेत.'
कोल्हापूर : ‘लोकसभेच्या (Kolhapur Lok Sabha) २०१९ मधील निवडणुकीत आमचा फार दोस्ताना होता असे नाही. त्यांना कोणाला तरी पराभूत करायचे होते. त्यामुळे ते माझ्याकडे आले होते, मी त्यांच्याकडे गेलो नाही’, असा टोला महायुतीचे उमेदवार खासदार प्रा. संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांचे नाव न घेता लगावला. मंडलिक यांनी शिवाजी उद्यमनगर येथील ‘सकाळ’च्या मुख्य कार्यालयाला भेट दिली. यावेळी ते बोलत होते.
सतेज पाटील यांचे नाव न घेता खासदार मंडलिक म्हणाले, ‘२०१९ च्या निवडणुकीत त्यांची राजकीय गरज होती. त्यामुळे ते मला मदत करायला आले. मी त्यांच्याकडे काही ठरवायला गेलो नव्हतो. यामध्ये आमचा फार दोस्ताना होता असे नाही तर, त्यांना कोणाला तरी पराभूत करायचे होते. गेल्या लोकसभा निवडणुकीत मी शिवसेना आणि भाजपचा उमेदवार होतो. त्यामुळे आम्ही कोठे जावे हा विषय नव्हता, तर तेच आमच्याकडे आले होते.’
संपर्क नसल्याची टीका करणाऱ्यांवर बोलताना ते म्हणाले, ‘वर्षातून दोन-दोन महिन्यांची तीन अधिवेशने असतात. यामध्ये कामाचे अर्धे दिवस गेले. यातच कोरोना आला. तरीही आम्ही लोकांना भेटत होतो. संजय मंडलिक कुठे दिसत नाही, हे अलीकडच्या काळात कोणीतरी खोटा प्रचार करत आहेत.
मी कुठे दिसत नाही म्हणून कोल्हापूर जिल्हा बँकेला (Kolhapur District Bank) निवडून आलो का?, ‘गोकुळ’मध्ये पॅनेल कसे विजयी केले?, ‘दक्षिण’मध्ये ऋतुराज पाटील यांच्या प्रचारात कोण होते?, ‘बिद्री’ला संपूर्ण पॅनेल तयार केले, त्याला लोकांनी भरघोस मते दिली. त्यामुळे हे सर्व मी कोठे दिसत नाही म्हणून किंवा लोकांमध्ये जात नाही म्हणून दिले का?’ असा सवालही मंडलिक यांनी केला.
‘आता काही तरी टिका करण्यासाठी पाहिजे म्हणूनच विरोधकांनी ही आवई उठवली आहे. खोट्याला खरे सांगून आणि खऱ्याला खोटे सांगण्याचा प्रचार सुरू झाला आहे. शहरात हिंदुत्ववादी मतांचा टक्का वाढल्याचेही मंडलिक यांनी सांगितले. महापुराच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामुळे कोल्हापूरला मोठी मदत मिळाल्याचे ते म्हणाले. ‘सकाळ’चे कार्यकारी संपादक निखिल पंडितराव यांनी प्रा. मंडलिक यांचे स्वागत केले. यावेळी ॲड. सुरेश कुऱ्हाडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भूषण पाटील उपस्थित होते.
प्रवक्ता नेमला का?
‘माझ्यावर टीका झाल्यानंतर मीच उत्तर द्यायला पाहिजे की पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी द्यायला पाहिजे? शाहू महाराजांवर टीका झाल्यानंतर महाराज उत्तर देतील, त्यांची उत्तरे सतेज पाटील कसे देतात, असा सवाल करत शाहू महाराजांनी पाटील यांना प्रवक्ता म्हणून नेमले आहे का?,’ असा प्रश्नही मंडलिक यांनी उपस्थित केला.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.