Lok Sabha Elections 2024
Lok Sabha Elections 2024 esakal

Lok Sabha Elections 2024 : मोदी, अमिताभ अन् कॅथार्सिस

गेल्या दहा वर्षांत भाजप म्हणजे मोदी आणि भारत सरकार म्हणजे मोदी सरकार असे चित्र उभे करण्यात मोदी यशस्वी झाले.
Published on
Summary

'मोदी हे ऐन फॉर्मातल्या अमिताभ बच्चनसारखे (Amitabh Bachchan) वाटतात. अमिताभचे अॅंग्री यंगमॅनचे सिनेमे सुरू झाले तेव्हा आधीचे हिरो अगदीच अळणी होते.'

-अ. ग. मते, रत्नागिरी

Lok Sabha Elections 2024 : गेल्या दहा वर्षांत भारतात निवडणुकीचे जे कथन सेट केले गेले आहे तेच ते बोलत होते. लोकशाहीत पक्ष, विचारधारा असतात वगैरे गोष्टी दूर फेकल्या जाऊन तुम्ही एका व्यक्तीला मतदान करा, तीच व्यक्ती सर्व काही करेल हेच ते कथन.

Lok Sabha Elections 2024
Sangli Lok Sabha : 'सांगलीच्या जागेबाबत माझा काही संबंध नाही'; असं का म्हणाले जयंत पाटील?

दहा वर्षे मागे बघितले तर चित्र काय होते? २०१४ च्या निवडणुकीपर्यंत मोदी (Narendra Modi) भाजपचे एक महत्त्वाचे नेते होते; पण एकमेव नेते नव्हते. पक्षात आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी हे बुजूर्ग नेते आपला आब आणि मान राखून होते. खुद्द मोदींएवढी किंवा काकणभर जास्त राष्ट्रीय प्रतिमा असणारे नेते होते. त्यात राजनाथ, नायडू आणि गडकरी हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. अरुण जेटली आणि सुषमा स्वराज हे उत्तम संसदपटू होते आणि मुख्यमंत्री म्हणून करिष्मा असणारे पर्रिकर पण होते.

दहा वर्षे मागे बघितले तर चित्र काय होते? २०१४ च्या निवडणुकीपर्यंत मोदी (Narendra Modi) भाजपचे एक महत्त्वाचे नेते होते; पण एकमेव नेते नव्हते. पक्षात आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी हे बुजूर्ग नेते आपला आब आणि मान राखून होते. खुद्द मोदींएवढी किंवा काकणभर जास्त राष्ट्रीय प्रतिमा असणारे नेते होते. त्यात राजनाथ, नायडू आणि गडकरी हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. अरुण जेटली आणि सुषमा स्वराज हे उत्तम संसदपटू होते आणि मुख्यमंत्री म्हणून करिष्मा असणारे पर्रिकर पण होते.

Lok Sabha Elections 2024
'लोकसभे'त सात कुटुंबांचेच वर्चस्व! 1977 पासूनचा इतिहास; कोल्हापुरातून गायकवाड-मंडलिक सर्वाधिक वेळा खासदार

मोदी आणि हे सगळे नेते एकाच उंचीचे आणि भाजपचे (BJP) आणि देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता असणारे होते; पण २०१४ ला मोदी भाजपचे प्रचारप्रमुख झाले आणि नंतरच्या प्रतिमा संवर्धनाच्या लाटेत एकट्या मोदींची प्रतिमा आभाळाएवढी झाली. दुर्दैवाने, पर्रिकर, जेटली, स्वराज काळाच्या पडद्याआड गेले. आडवाणी, जोशी, नायडू वानप्रस्थाला गेले. राजनाथ आणि गडकरी यांनी शिस्तबद्ध स्वयंसेवकाची भूमिका स्वीकारली. गेल्या दहा वर्षांत भाजप म्हणजे मोदी आणि भारत सरकार म्हणजे मोदी सरकार असे चित्र उभे करण्यात मोदी यशस्वी झाले आणि म्हणून मोदीकी गॅरंटी असे बिनदिक्कत ठासून बोलले जाऊ लागले.

Lok Sabha Elections 2024
Sangli Lok Sabha : संजय पाटील, विशाल पाटील कोट्यधीश; 'मविआ'चे उमेदवार चंद्रहार पाटलांची किती आहे संपत्ती?

हे बघताना मला मोदी हे ऐन फॉर्मातल्या अमिताभ बच्चनसारखे (Amitabh Bachchan) वाटतात. अमिताभचे अॅंग्री यंगमॅनचे सिनेमे सुरू झाले तेव्हा आधीचे हिरो अगदीच अळणी होते. गरिबी, गुंडगिरी, काळाबाजार या विरुद्ध ते काही करत नव्हते. मग, अमिताभ आला. तो या सगळ्यांविरुद्ध लढायचा म्हणजे मारामारी करायचा. एकावेळी कितीही गुंडांना मारायचा. वेळ आली तर देवाला चार गोष्टी ऐकवायचा. जबरदस्त डायलॉग मारायचा. त्याला काही अशक्य नसायचे. तो गुंडांना तर मारायचाच; पण वाघाबरोबर, मगरीबरोबर पण फाईट करायचा. अंगात गोळ्या घुसल्या तरी फाईट करायचा. प्रेक्षक स्वत:ला त्याच्यात बघायचे आणि सिनेमा संपताना दुष्टांवर मात केल्याचे, आपणच लढल्याचे फसवे समाधान घेऊन घरी जायचे. लोकांच्या भावनांचे कॅथार्सिस व्हायचे.

मोदींची राष्ट्रीय राजकारणातली एण्ट्री अशी अमिताभसारखी झाली. मनमोहन सिंगांचे सरकार अपयशी आणि सप्‍पक होते.स्वाभिमान नव्हता. बजबपुरी माजली वगैरे कथानक अण्णा हजारे यांच्या सौजन्याने रामलीला मैदानात तयार झाले. त्याचवेळी सोशल मीडियाचा प्रभाव जाणवायला लागला होता. या पार्श्वभूमीवर मोदी नावाचे अॅंग्री यंग नेते आले. ते आले आणि अमिताभसारख्या हिरोच्या शोधात असणाऱ्या भारतीय मनाला नवा नायक सापडला. गेली दहा वर्षे या नायकाने सगळा अवकाश व्यापून टाकला आहे. या नायकाने अमिताभप्रमाणे फाईट केली. टाळ्या आणि थाळ्या वाजवून कोरोना घालवला. सगळा काळा पैसा क्षणात नाहीसा केला आणि मुख्य म्हणजे सर्जिकल स्ट्राईक केला.

Lok Sabha Elections 2024
Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha : नारायण राणेंची धुरा मित्रपक्षांच्या मदतीवर; भावनिक वातावरण ठरणार डोकेदुखी

सातत्याने मिळेल तिथून भाषणे केली. डायलॉगबाजी केली. लोकांच्या देशभक्तीचे सोप्या पद्धतीने कॅथार्सिस होऊ लागले. प्रत्येकाला आपण मोदींशी जोडले आहोत किंवा असावे, असे वाटण्यात मोदींचे आणि हे कथानक रचणाऱ्यांचे मोठे यश आहे. या प्रक्रियेत मतदाराचा ( मतदार या शब्दात ते देणाऱ्याला काही एक मत आहे, ते बऱ्या वाईट विचारांती तयार झाले आहे आणि ते तो विचारपूर्वक देणार आहे ही प्रोसेस समाविष्ट आहे) आधी लाभार्थी आणि आता टाळ्या पिटणारा प्रेक्षक मात्र झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.