Kolhapur Lok Sabha
Kolhapur Lok Sabhaesakal

'लोकसभे'त सात कुटुंबांचेच वर्चस्व! 1977 पासूनचा इतिहास; कोल्हापुरातून गायकवाड-मंडलिक सर्वाधिक वेळा खासदार

हातकणंगले लोकसभा (Hatkanangale Lok Sabha) मतदारसंघात दिवंगत बाळासाहेब माने यांनी सलग पाचवेळा प्रतिनिधित्‍व केले.
Published on
Summary

२०१९ च्या निवडणुकीत शेट्टी यांचा पराभव करून माने यांचे नातू व निवेदिता माने यांचे पुत्र धैर्यशील माने यांनी हा गड जिंकला.

कोल्हापूर : देशाचे भवितव्य ठरवणाऱ्या लोकसभेच्या (Kolhapur Lok Sabha) रिंगणात १९७७ पासून जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांत पाच कुटुंबांचेचे वर्चस्व राहिले आहे. घराणेशाहीचा आरोप एकीकडे होत असताना मतदारांनी या दोन्ही मतदारसंघांत त्याच त्याच कुटुंबांतील सदस्यांना लोकसभेत पाठविले आहे.

Kolhapur Lok Sabha
Sangli Lok Sabha : 'सांगलीच्या जागेबाबत माझा काही संबंध नाही'; असं का म्हणाले जयंत पाटील?

दरम्यान, हातकणंगेलतून सर्वाधिक वेळा लोकसभेत पोहचण्याची संधी दिवंगत माजी खासदार बाळासाहेब माने यांच्या कुटुंबाने तर कोल्हापुरातून माजी खासदार उदयसिंगराव गायकवाड व दिवंगत सदाशिवराव मंडलिक (Sadashivarao Mandalik) यांच्या कुटुंबातील सदस्य सर्वाधिक वेळा लोकसभेत पोहोचले आहेत.

हातकणंगले लोकसभा (Hatkanangale Lok Sabha) मतदारसंघात दिवंगत बाळासाहेब माने यांनी सलग पाचवेळा प्रतिनिधित्‍व केले. त्यानंतर दोनवेळा काँग्रेसचे (Congress) माजी खासदार कल्लाप्पाण्‍णा आवाडे निवडून आले. पण, पुन्हा १९९९ पासून माने यांच्या स्नुषा निवेदिता माने यांनी सलग दोनवेळा या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले.

Kolhapur Lok Sabha
Sangli Lok Sabha : काँग्रेसचा शेवटचा प्रयत्नही असफल; 'उत्तर मुंबई'च्या बदल्यात 'सांगली'चा प्रस्तावही ठाकरेंनी फेटाळला

२००९ च्या निवडणुकीत माने यांचा पराभव करून ‘स्वाभिमानी’चे राजू शेट्टी (Raju Shetti) सलग दोनवेळा खासदार झाले. पण, २०१९ च्या निवडणुकीत शेट्टी यांचा पराभव करून माने यांचे नातू व निवेदिता माने यांचे पुत्र धैर्यशील माने यांनी हा गड जिंकला. यावेळीही धैर्यशील मानेच पुन्हा रिंगणात आहेत. १९७७ पासूनचा विचार करता या मतदारसंघावर माने, आवाडे व शेट्टी घराण्यांचे वर्चस्व राहिले आहे.

कोल्हापुरातून १९७७ मध्ये काँग्रेसचे दिवंगत शंकरराव माने (Shankarrao Mane) यांचा पराभव करून शेकापचे दाजीबा देसाई खासदार झाले. त्यानंतर १९८० ते १९८६ या काळात सलग पाचवेळा दिवंगत उदयसिंगराव गायकवाड यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. गायकवाड यांचा पराभव करून कै. सदाशिवराव मंडलिक यांनी पहिल्यांदा १९९८ मध्ये लोकसभेत प्रवेश केला. तेव्हापासून २००९ पर्यंत ते खासदार राहिले.

Kolhapur Lok Sabha
Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha : PM मोदी विजयाची हॅट्‌ट्रिक करणार आणि मी अडीच लाख मतांनी विजयी होणार - नारायण राणे

२०१४ साली राष्ट्रवादीच्या चिन्हावर या मतदारसंघातून खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) विजयी झाले. पण, २०१९ मध्ये महाडिक यांचा पराभव करून दिवंगत मंडलिक यांचे पुत्र प्रा. संजय मंडलिक खासदार झाले. आता २०२४ च्या निवडणुकीत पुन्हा प्रा. मंडलिक महायुतीचे उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. विशेष म्हणजे २०१९ च्या निवडणुकीत प्रा. मंडलिक यांनी ज्यांचा पराभव केला ते धनंजय महाडिक हे त्यांच्या प्रचारात सक्रिय आहेत.

दृष्टिक्षेपात आतापर्यंतचे खासदार

वर्ष कोल्हापूर मतदारसंघ

  • १९७७ दिवंगत दाजीबा देसाई

  • १९८० ते १९९६ दिवंगत उदयसिंगराव गायकवाड

  • १९९९ ते २००९ दिवंगत सदाशिवराव मंडलिक

  • २०१४ खासदार धनंजय महाडिक

  • २०१९ खासदार प्रा. संजय मंडलिक

Kolhapur Lok Sabha
Kolhapur Lok Sabha : कुणाच्या तरी पराभवासाठी 'ते' माझ्यासोबत आले; गौप्यस्फोट करत मंडलिक सतेज पाटलांबद्दल काय म्हणाले?

वर्ष हातकणंगले मतदारसंघ

  • १९७७ ते १९९१ दिवंगत बाळासाहेब माने

  • १९९६, १९९८ कल्लाप्पाण्णा आवाडे

  • १९९९, २००४ निवेदिता माने

  • २००९, २०१४ राजू शेट्टी

  • २०१९ धैर्यशील माने

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()