Kolhapur Lok Sabha Bajirao Khade
Kolhapur Lok Sabha Bajirao Khadeesakal

Kolhapur Lok Sabha : सांगलीपाठोपाठ कोल्हापुरात काँग्रेसमध्ये बंडखोरी; प्रियांका गांधींचा विश्‍वासू सहकारी रिंगणात

गेली अडीच वर्षे मतदारसंघात तयारी करूनही पक्षाने दखल न घेतल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.
Published on
Summary

आमच्या कार्याचे मोजमाप झाले नाही. काँग्रेसच्या स्थानिक आणि राज्यातील नेत्यांनी स्वाभिमान दुखावला आहे.

कोल्हापूर : सांगली पाठोपाठ आता लोकसभेच्या कोल्हापूर मतदारसंघातही (Kolhapur Lok Sabha) कॉंग्रेसमध्ये (Congress) बंडखोरी झाली आहे. पक्षाचे राष्ट्रीय सचिव व प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांचे विश्‍वासू सहकारी बाजीराव खाडे (Bajirao Khade) यांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे.

अर्ज भरल्यानंतर प्रसिद्धी-माध्यमांसमोर बोलताना त्यांना अश्रू अनावर झाले. गेली अडीच वर्षे मतदारसंघात तयारी करूनही पक्षाने दखल न घेतल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. माझ्यावर दबाव टाकण्याचे काम सुरू असून त्याला बळी पडणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

Kolhapur Lok Sabha Bajirao Khade
Sangli Lok Sabha : कारखाना चालवता येईना अन् निघालाय खासदार व्हायला; अजितदादांनी विशाल पाटलांना हाणला टोला

श्री. खाडे अडीच वर्षांपासून कॉंग्रेसची उमेदवारी मिळणार, अशा आत्मविश्‍वासाने तयारी करत होते; परंतु पक्षाने श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांना उमेदवारी जाहीर केली. त्यानंतरही त्यांनी मतदारसंघात संपर्क सुरू ठेवला. आज त्यांनी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर खाडे म्हणाले, ‘‘अर्ज भरू नये, यासाठी आपल्यावर दबाव टाकला जात आहे; परंतु त्याला आपण बळी पडणार नाही. ही न्यायाची लढाई आहे. न्याय देण्याची भाषा कुठून होणार असेल तर विचार केला जाईल.

Kolhapur Lok Sabha Bajirao Khade
Uday Samant : 'अमित शहांचा मान ठेवत एक पाऊल मागं घेतलं, पण भविष्यात किरण सामंत खासदार होणार'

काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून गेली २८ वर्षे एकनिष्ठपणे काम करत आहे. ती विचारधारा आमच्याकडून कोणीही काढून घेऊ शकत नाही. गेल्या अडीच वर्षांपासून लोकसभा निवडणुकीची तयारी करत आहे. आपण काँग्रेसकडून उमेदवारी मागितली होती. ज्यावेळी उमेदवारीबाबत चर्चा झाली, त्यावेळी मला विचारात घेतले नाही. केवळ सर्वसामान्य कुटुंबातील असल्याने आपली योग्यता नाकारली.

या निर्णयामुळे काँग्रेसच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांचे मनोबल खचले आहे. आमच्या कार्याचे मोजमाप झाले नाही. काँग्रेसच्या स्थानिक आणि राज्यातील नेत्यांनी स्वाभिमान दुखावला आहे. मात्र, स्वाभिमानी कार्यकर्त्याच्या पाठीमागे ही जनता असते, ही माझी एकट्याची लढाई नाही. कार्यकर्त्यांचे जनमत विचारात घेण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे.’’ या भावना व्यक्त करताना त्यांना अश्रू अनावर झाले.

Kolhapur Lok Sabha Bajirao Khade
Kolhapur Lok Sabha : 'नथुराम गोडसेच्या विचाराने चाललेल्या भाजप सरकारला उलटवून टाका'; शाहू महाराजांच्या प्रचारार्थ मेळावा

नेत्यांनी उमेदवारी डावलल्‍याने अश्रू अनावर

मूळ काँग्रेसला बेदखल केले जात आहे. वर्षभरापूर्वी काँग्रेससाठी सकारात्मक वातावरण होते; मात्र स्थानिक आणि राज्यातील नेत्यांनी त्याचे आकलन केले नाही. वरिष्ठ नेत्यांनी माझ्या उमेदवारीबाबत सांगितले होते. मात्र, स्थानिक आणि राज्यातील नेत्यांनी माझी उमेदवारी डावलली. त्यामुळे उमेदवार निवडीची प्रक्रिया पुन्हा एक दोन माणसाच्या प्रभावाने होऊन उपयोगी नाही, असे ते म्‍हणाले. काँग्रेसच्या मूल्यांना धरून ही प्रक्रिया होत नसल्याची खंतही त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()