Kolhapur Lok Sabha
Kolhapur Lok Sabhaesakal

Kolhapur Lok Sabha : 'निष्क्रिय खासदार उत्तर द्याच!.. हा घ्या पुरावा..’ सोशल मीडियावर तापली निवडणूक

संजय मंडलिकांना उद्देशून निष्क्रिय खासदारांनी उद्योगांसाठी काय केले? असा प्रश्‍न उपस्थित केला आहे.
Published on
Summary

मंडलिक समर्थकांकडूनसुद्धा हा घ्या पुरावा म्हणून आजपर्यंत केलेल्या पाठपुराव्याची माहिती, पत्रव्यवहारासह उत्तरात दिली आहे.

कोल्हापूर : ‘निष्क्रिय खासदार उत्तर द्याच !,’ ... ‘यावर हा घ्या पुरावा...’ अशा पद्धतीने सोशल मीडियावर थेट आरोप-प्रत्यारोप आता सुरू झाले आहेत. एवढेच काय तर खासदारांनी खुलासा केल्यानंतर... खुल्या चर्चेसाठी महाराज स्वतः येणार काय? असाही प्रतिप्रश्‍न पुढे आला आहे. रस्त्यावर, गल्ली-बोळात, वाडी-वस्तीत ज्या पद्धतीने निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे, तशीच निवडणूक आता सोशल मीडियावरही (Social Media) तापली आहे.

निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप हे ठरलेलेच असते. त्यामध्ये एका ठराविक पातळीवर हे आरोप-प्रत्यारोप थांबले नाहीत तर त्याची ठिणगी पडते आणि पुढे खुन्नस निर्माण होते. यानंतर गुन्हे दाखल होऊन पेटलेला वाद थेट न्यायालयाच्या पायऱ्यापर्यंत जातो. हे अनेकवेळा सर्वांनी पाहिले आहे.

Kolhapur Lok Sabha
Kolhapur Lok Sabha : वीरेंद्र मंडलिकांचं छत्रपती घराण्यावर खळबळजनक विधान; म्हणाले, समरजितसिंह घाटगेच खरे..

यामध्ये आता सोशल मीडियाने भर घातली आहे. कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Lok Sabha) मतदारसंघातील महाविकास आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांच्या समर्थकांकडून आरोप-प्रत्यारोपांची फैरी झाडल्या जात आहेत. रोज एक प्रश्‍न घेऊन महायुतीच्या (Mahayuti) विद्यमान खासदारांना छेडण्याचा प्रयत्न याच सोशल मीडियावर होत आहे. यामध्ये संजय मंडलिकांना उद्देशून निष्क्रिय खासदारांनी उद्योगांसाठी काय केले? असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. त्यावर मंडलिक समर्थकांकडूनसुद्धा हा घ्या पुरावा म्हणून आजपर्यंत केलेल्या पाठपुराव्याची माहिती, पत्रव्यवहारासह उत्तरात दिली आहे.

Kolhapur Lok Sabha
Sangli Lok Sabha : विशाल पाटील आमचे शत्रू नाहीत, पण..; वसंतदादांचा दाखला देत काय म्हणाले संजय राऊत?

एवढेच नव्हे तर खुल्या चर्चेसाठी महाराज स्वतः येणार काय? असाही प्रतिप्रश्‍न केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून उमेदवार स्वतः आणि त्यांचे कुटुंबीयसुद्धा कशा पद्धतीने प्रचारात सक्रिय झाले आहेत, याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल केली जात आहे. रिल, स्टोरीसुद्धा पाहण्यास मिळत आहेत. नुकताच मधुरिमाराजे यांनी लहान मुले क्रिकेट खेळ असताना प्रचारादरम्यान त्यांच्यामध्ये जाऊन जोरदार बॅटिंग केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, तर संजय मंडलिकांचे पुत्र वीरेंद्र मंडलिकसुद्धा कोणकोणत्या गावांत जाऊन प्रचार करीत आहेत, तेथे कसा प्रतिसाद मिळत आहे, त्याची रिल, स्टोरी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Kolhapur Lok Sabha
Yashwantrao Chavan : भारत-चीन युद्ध अन् हिमालयाच्या मदतीला धावला 'सह्याद्री'

फेक आहे... तरीही चालतंय..

मराठा आरक्षण आंदोलनावेळी सर्वच लोकप्रतिनिधींना गावबंदी केली होती. त्यावेळी नेत्यांना गावात येण्यास बंदी केल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले होते. त्याचाच उपयोग आता निवडणुकीत केला जात आहे. उमेदवारांना गावबंदी केली जात असल्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत. याचाच संदर्भ घेत गावकऱ्यांनीही हे व्हिडिओ ‘फेक’ आहेत. ते मराठा आराक्षणावेळचे असल्याचाही खुलासा सोशल मीडियाद्वारे केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.