Shiv Sena : धनुष्यबाण चिन्ह कोकणातून हद्दपार; भाजपसमोर शिंदे गट हतबल, 20 वर्षांच्या समीकरणात बदल
बाळासाहेबांनी कोकणात शिवसेना रुजवली. कोकणातील घराघरात धनुष्यबाण पोहचवले. त्याच कोकणातून शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह हद्दपार करण्याचे काम भाजपने केले.
चिपळूण : बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची शिवसेना (Shiv Sena) वाचवण्यासाठी आम्ही भाजपबरोबर गेल्याचा दावा शिवसेना शिंदे गटाने केला. मात्र लोकसभा निवडणुकीत बीजेपीच्या दबावतंत्रापुढे शिंदेची शिवसेना झुकली. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांनी निवडलेले धनुष्यबाण (Bow and Arrow Symbol) हे चिन्ह या लोकसभा निवडणुकीत कोकणातून हद्दपार झाले आहे.
कोकणात शिवसेना (Konkan Shiv Sena) आणि धनुष्यबाण हे गेली वीस वर्ष निर्माण झालेले समीकरण सिंधूदुर्ग रत्नागिरी मतदार संघात भाजपच्या नारायण राणे यांचे नाव जाहीर झाल्याने किमान लोकसभा निवडणुकीत धनुष्यबाण हे चिन्ह अदृश्य झाले आहे.
१९९६ मध्ये त्यावेळच्या राजापूर मतदार संघातून शिवसेनेचे सुरेश प्रभू यांनी पहिल्यांदा धनुष्यबाण चिन्हावर विजयी झाले होते. कोकणात तेव्हा लोकसभेचे राजापूर, रत्नागिरी, आणि कुलाबा असे तीन मतदार संघ होते. धनुष्यबाण चिन्हावर १९९६, १९९८, १९९९ आणि २००४ मध्ये सुरेश प्रभू विजयी झाले. कोकणात शिवसेना आणि धनुष्यबाण हे समीकरण तयार झाले.
देशात २००८ रोजी झालेल्या मतदार संघ पुर्नरचनेत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्हयाचा एक मतदार संघ करण्यात आला. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या नीलेश राणे यांनी सुरेश प्रभू यांचा पराभव केला. शिवसेना भाजप युतीत २०१४ मधील निवडणुकीत शिवसेनेने पुन्हा या मतदार संघात आपले अस्तित्व निर्माण केले. धनुष्यबाणावर विनायक राऊत यांनी २०१९ मध्ये या मतदार संघावर वर्चस्व कायम ठेवले.
राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर वेगळेच राजकीय समीकरण तयार झाल्याने बालेकिल्लातूनच धनुष्यबाण हद्दपार झाले आहे. विशेष, म्हणजे या ठिकाणी भाजपने उमेदवार देत मित्रपक्षांवर यशस्वीपणे कुरघोडी केली आहे.
बाळासाहेबांनी कोकणात शिवसेना रुजवली. कोकणातील घराघरात धनुष्यबाण पोहचवले. त्याच कोकणातून शिवसेनेचे धनुष्यबाण हे चिन्ह हद्दपार करण्याचे काम भाजपने केले. शिंदे गट भाजपसमोर हतबल झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र बाळासाहेबांचे स्वाभिमानी शिवसैनिक भाजपचा डाव हाणून पाडतील.
-विनोद झगडे, तालुकाप्रमुख, शिवसेना ठाकरे गट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.