Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha : उद्धव ठाकरेंच्या नाकावर टिचून नारायण राणेंना निवडून देऊ; केसरकरांनी दिला स्पष्ट इशारा
‘‘पंतप्रधान मोदींनी देशाचा सर्वांगीण विकास केला असून देशाची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर आहे.''
बांदा : मी पालकमंत्री असताना राणेंसोबत फिरलो असतो तर जिल्ह्याचा कायापालट झाला असता. आता उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) येथे प्रचाराला आले तर त्यांना माघारी पाठवू. त्यांच्या नाकावर टिचून नारायण राणेंना (Narayan Rane) निवडून देऊ, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी इन्सुली येथे झालेल्या महायुतीच्या मेळाव्यात केले.
महायुतीचे (Mahayuti) उमेदवार राणेंच्या उपस्थितीत झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. ते म्हणाले, ‘‘उबाठा शिवसेनेने प्रचारासाठी उद्धव ठाकरेंनी यावे, आदित्यने यावे. जसे राणेंनी आपल्या पोटनिवडणुकीत त्यांना माघारी पाठविले होते तसेच आम्ही त्यांना माघारी पाठवून त्यांच्या नाकावर टिचून राणे यांना निवडून आणणार आहोत व त्यांना केंद्रात मंत्री करण्यासाठी बळ देणार आहोत. कारण सिंधुदुर्ग लोकसभा (Sindhudurg Lok Sabha) मतदारसंघाला एक वेगळा इतिहास आहे.
येथे निवडून आलेला खासदार नेहमी केंद्रात मंत्री बनतो तर विद्यमान खासदारामध्ये क्षमता नसल्याने सत्तेत असतानाही त्यांना मंत्री पद दिले नाही. त्यावरून जनतेने त्यांची कुवत ओळखावी. मी पालकमंत्री असताना जर राणे व मी एकत्र असतो तर जिल्ह्याचा कायापालट केला असता. मी कधी ग्रामपंचायत निवडणूकित गावोगावी फिरत नाही, कारण मला सगळेच जण मतदान करतात. त्यामुळे माझी आकडेवारी घ्यावी आणि त्यानुसार राणेंना आम्ही लीड देऊ.’’
केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, ‘‘पंतप्रधान मोदींनी देशाचा सर्वांगीण विकास केला असून देशाची अर्थव्यवस्था जगात पाचव्या क्रमांकावर आहे. त्याचमुळे देशभरात ‘चारशे पार’चा नारा सुरू असताना उद्धव ठाकरे मात्र ‘अब की बार तडीपार’ असे बोलत आहेत. त्यांना मी एकच सांगेन की आता तुमचे ५ खासदार आहेत; मात्र जून महिन्यात त्याची संख्या शून्य असेल. कोरोना काळात उद्धव ठाकरेंनी जी औषधेवरील कमिशन खाल्ली त्याची चौकशी सुरू असून ते कधी पण जेलमध्ये जातील. विद्यमान खासदाराने दहा वर्षात केलेलं एक तरी काम दाखवावे आणि मगच मते मागायला फिरावे’’
यावेळी व्यासपीठावर माजी आमदार राजन तेली, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, भाजपा जिल्हा सरचिटणीस संजू परब, राष्ट्रवादी काँग्रेस सरचिटणीस सुरेश गवस, सावंतवाडी तालुकाध्यक्ष उदय भोसले, बांदा मंडल तालुकाध्यक्ष महेश धुरी, माजी सभापती मानसी धुरी, बांदा मंडल महिला तालुकाध्यक्ष रूपाली शिरसाट, शिवसेना महिला जिल्हाध्यक्ष ॲड. नीता सावंत-कविटकर, सावंतवाडी तालुकाध्यक्ष नारायण राणे, वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, माजी सभापती गुरुनाथ पेडणेकर, भाजपा जिल्हा कार्यकारिणी सदस्य चंद्रकांत जाधव, डॉ. मिलींद कुलकर्णी, डेगवे उपसरपंच प्रवीण देसाई, मंडल तालुका उपाध्यक्ष मधुकर देसाई, भाजपा भटके विमुक्त सेल जिल्हाध्यक्ष नवलराज काळे, प्रदेश उपाध्यक्ष बाळा गोसावी आदी उपस्थित होते.
यावेळी राजन तेली, अशोक दळवी, सुरेश गवस आदींनी मार्गदर्शन केले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या उन्नती धुरी, माजी सभापती अंकुश जाधव, कास सरपंच प्रवीण पंडित, शेर्ले सरपंच प्रांजल जाधव, रोणापाल सरपंच योगिता केणी, वाफोली उपसरपंच वीनेश गवस, उदय देऊलकर, महेंद्र सावंत, औदुंबर पालव, उमेश पेडणेकर, योगेश केणी, महेश धुरी, झेवियर फर्नांडीस, अनादी गावडे, मंगलदास देसाई, राजन परब, स्वागत नाटेकर, दिनेश राणे, उदय धुरी, आत्माराम गावडे, सचिन देसाई, मधुकर चुडे देसाई, मधुकर देसाई, गणपत गावडे, कृष्णा सावंत, वर्षा सावंत, प्रथमेश सावंत, दिलीप पेडणेकर आदी उपस्थित होते. प्रस्ताविक गुरुनाथ पेडणेकर, सूत्रसंचालन विकास केरकर यांनी केले तर बबन राणे यांनी आभार मानले.
रोजगाराचा प्रश्न कायमचा मिटणार - राणे
राणे पुढे म्हणाले, ‘‘कोरोना काळात देशाचे पंतप्रधान देश वाचविण्यासाठी धडपड करत होते. कोरोनावर उपचार तातडीने व्हावेत, यासाठी त्यांनी देशातच लस तयार केली; मात्र आमचे मुख्यमंत्री मात्र तेव्हा केवळ हात कसे चोळावे हे सांगत बसले होते. कोकणातील युवकांनी उद्योग व्यवसायाकडे वळावे यासाठी मी नेहमी प्रेरणा देत असतो. युवकांनी पुढे यावे मी मार्गदर्शन करेन. येत्या काळात जिल्ह्यात ५०० हुन अधिक उद्योजक येतील. त्यामुळे येथील रोजगाराचा प्रश्न कायमचा मिटणार असून खऱ्या अर्थाने आर्थिक सुबत्ता येईल. दोडामार्ग तालुक्यात मेडिकल साधन सामुग्री बनविण्याचा कारखाना होईल. त्यासाठी १२०० एकर जागा राखीव ठेवली आहे. त्याचमुळे येत्या निवडणुकमध्ये मोदींचे हात बळकट करण्यासाठी भाजपाला मत द्या.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.