'28 वर्षांपासून काँग्रेसमध्ये काम करतोय, आम्हाला तिकीट देऊ नका; पण..'; काय म्हणाले बंडखोर उमेदवार खाडे?

‘गेल्या २८ वर्षांपासून काँग्रेस (Congress) पक्षात काम करत आहे.
Bajirao Khade Kolhapur Lok Sabha
Bajirao Khade Kolhapur Lok Sabhaesakal
Published on
Summary

'काँग्रेसमध्ये तिकीट वाटपाची जी कार्यपद्धती आहे, ती राज्यात आणि जिल्ह्यात वापरली नाही. आम्हाला तिकीट देऊ नका; पण किमान आमचा विचार तर करा.'

कोल्हापूर : ‘गेल्या २८ वर्षांपासून काँग्रेस (Congress) पक्षात काम करत आहे. आम्हाला तिकीट देऊ नका; पण किमान आमचा विचार तर करा. कामाचा आहे तोपर्यंत काम करून घ्यायचं आणि काम झाल्यानंतर वाऱ्यावर सोडून द्यायचे, याचा परिणाम म्हणूनच आपण निवडणूक रिंगणात उतरलो असल्याचे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाजीराव खाडे (Bajirao Khade) यांनी सांगितले. येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

Bajirao Khade Kolhapur Lok Sabha
Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha : मुस्लिम मतदारांचा कल कुणाकडे? राणे विरुद्ध राऊत यांच्यात चुरशीची लढत

खाडे म्हणाले, ‘गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाचे काम केले. त्याची दखल कोणीही घेतली नाही. सर्वसामान्यांनी निवडणूक (Kolhapur Lok Sabha) लढवायची नाही. काँग्रेसमध्ये तिकीट वाटपाची जी कार्यपद्धती आहे, ती राज्यात आणि जिल्ह्यात वापरली नाही. आम्हाला तिकीट देऊ नका; पण किमान आमचा विचार तर करा. याचा अर्थ पक्षाला आमची किंमत नाही का? आम्हाला स्वाभिमान नाही का? त्यामुळे आम्ही ही निवडणूक लढवणार आहे.

आम्ही थांबायला तयार आहे. मात्र, काल सकाळी अकरापर्यंत कोणाचाही फोन आला नाही. पुढे संधी देऊ, याबद्दल काहीही चर्चा नाही. याचा अर्थ पक्षाला आमची गरज नाही. कामाचा आहे तोपर्यंत काम करून घ्यायचे आहे. काम झाल्यानंतर वाऱ्यावर सोडून द्यायचे हे परिणामासह आम्ही दाखवून देत आहे. शेतकरी, बेरोजगार, कोल्हापुरातील आयटी पार्कचे काम करण्यासाठी पुढाकार घेणार आहे.

Bajirao Khade Kolhapur Lok Sabha
Kolhapur Lok Sabha : बळ समान, कुणाला मिळणार विजयाचा मान; पाठिराख्यांना सक्रिय करण्याचे नेत्यांसमोर आव्हान

वीस दिवसांपूर्वी जिल्ह्यातील नेतेमंडळी भेटली. आम्ही त्यांचा आदर करतो. मात्र, तिकीट वाटपासाठी काँग्रेसमध्ये जी प्रक्रिया आहे, ती राबवली का नाही. पक्षात काम करूनही आम्हाला तिकीट मिळणार नसेल, तर आम्ही कोणाकडे बघायचे?’ यावेळी उत्तम कासोटे, एन. जी. खाडे, विक्रमसिंह गायकवाड, डॉ. एकनाथ पाटील, कृष्णात खाडे उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.