Tapovan Maidan Kolhapur
Tapovan Maidan Kolhapuresakal

तपोवनवर घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; रखरखत्या उन्हातही उत्साह, आजी-माजी आमदारांचं जोरदार शक्तिप्रदर्शन

पंतप्रधान नरेंद्र मोदी दहा वर्षांनंतर कोल्हापूरला येत असल्याने त्यांच्या दौऱ्याची प्रचंड उत्सुकता होती.
Published on
Summary

मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय श्रीराम, भारत माता की जयच्या घोषणा देताच याला उपस्थितांनी प्रचंड प्रतिसाद दिला.

कोल्हापूर : जिल्ह्याच्या (Kolhapur Lok Sabha) काना-कोपऱ्यातून आलेले हजारो कार्यकर्ते, रखरखत्या उन्हातही त्यांच्यातील सळसळता उत्साह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या आगमनानंतर अखंड सुरू झालेला ‘मोदी...मोदी’चा नारा, असे जल्लोषी वातावरण तपोवन मैदानाने अनुभवले. निमित्त होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महासंकल्प विजय सभेचे. दरम्यान, मोदी यांचा विविध मान्यवरांनी कोल्हापुरी फेटा बांधून, तसेच करवीर निवासिनी आई अंबाबाईची प्रतिमा, राम लल्लाची मूर्ती, सेंद्रिय गूळ, संत बाळूमामांची मूर्ती देऊन स्वागत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी दहा वर्षांनंतर कोल्हापूरला येत असल्याने त्यांच्या दौऱ्याची प्रचंड उत्सुकता होती. सभेची वेळ सायंकाळी पाच वाजताची असली तरीही दुपारपासूनच जिल्ह्यातील नागरिक, कार्यकर्ते तपोवन मैदानाकडे येत होते. महायुतीच्या (Mahayuti) आजी-माजी आमदारांनी शक्तिप्रदर्शन करत आपआपले कार्यकर्ते सभास्थळी आणले. यावेळी कार्यकर्त्यांनी आपआपल्या पक्षासह उमेदवारांच्या चिन्हाचे स्कार्फ गळ्यात घातले होते. मान गादीला, मत मोदीला. अब की बार ४०० पार, हमारा परिवार मोदी परिवार, असे फलक हातात घेऊन कार्यकर्ते सभा स्थळाकडे जात होते.

Tapovan Maidan Kolhapur
Satara Lok Sabha : शिंदेंना अटक केल्यास राज्यभर आंदोलन करणार; शरद पवारांचा थेट इशारा

महिलांनीही भगव्या रंगाच्या साड्या परिधान केल्या होत्या. गळ्यात भगवा स्कार्फ व फेटा बांधला होता. या वातावरणामुळे शहरात भगवी लाट दिसून आली. सायंकाळी ५ वाजून ४९ मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सभास्थळी आगमन झाले. यावेळी उपस्थित हजारो लोकांनी उभे राहून त्यांना अभिवादन केले. यासह मोदी...मोदी नावाची जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. यामध्ये महिलांही आघाडीवर होत्या.

मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय श्रीराम, भारत माता की जयच्या घोषणा देताच याला उपस्थितांनी प्रचंड प्रतिसाद दिला. सभा मंडपाकडे येण्यासाठी आठ ते नऊ मार्ग ठेवले होते. त्यानंतर त्या-त्या तालुक्यानुसार लोक सभामंडपात येत होते. त्यांना सभास्थळी सोडण्यासाठी प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. चित्रनगरी, रंकाळा, कळंब्यासह शहरात येणाऱ्या प्रत्येक मार्गावर पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. त्यामुळे शहरातील वाहतुकीची कोंडी झाली.

Tapovan Maidan Kolhapur
Satara Lok Sabha : 'मोदींची लाट सुनामीसारखी, लाटेत शरद पवारांचे सर्व उमेदवार पराभूत होणार'; बावनकुळेंना विश्वास

मुश्रीफ, मंत्री सामंत यांची थेट कार्यकर्त्यांत एंट्री

पंतप्रधान मोदी येण्याआधी कार्यकर्त्यांना बसण्याचे नियोजन करण्यासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि मंत्री उदय सामंत हे थेट उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये जाऊन शांततेत सभा पार पाडण्यास खुर्च्यांवर बसून घेण्याचे आवाहन केले. याला उपस्थित कार्यकर्त्यांनी दाद देत त्यांचे स्वागत केले.

मुख्यमंत्र्यांकडून पोलिसांना सूचना अन्...

सभास्थळी येण्यासाठी लोकांचे प्रचंड हाल झाले. दरम्यान, पोलिसांकडून होत असलेल्या विविध चौकशीमुळे कार्यकर्ते संतप्त झाले. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत:च बाहेर असणाऱ्या लोकांना सभागृहात येण्याबद्दलच्या पोलिसांना सूचना दिल्या. त्यानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

कोल्हापुरी पद्धतीने स्वागत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सभेच्या सुरुवातीला कोल्हापुरी पद्धतीने स्वागत झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करवीर निवासिनी आई अंबाबाईची प्रतिमा त्यांना भेट दिली, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरी फेटा बांधून स्वागत केले. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राम लल्लाची मूर्ती मोदी यांना भेट दिली. खासदार संजय मंडलिक यांनी कोल्हापूरचा सेंद्रिय गूळ दिला. खासदार धैर्यशील माने यांनी संत बाळूमामा यांची मूर्ती भेट दिली. खासदार धनंजय महाडिक यांनी आई अंबाबाईची मूर्ती भेट देऊन स्वागत केले.

Tapovan Maidan Kolhapur
Kolhapur Lok Sabha : कोल्हापुरात मोदींच्या सभेला तुफान प्रतिसाद; गर्दीचे रूपांतर मतांत करताना नेत्यांचा लागणार कस

रामदास आठवलेंनी भरला रंग

‘छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले यांची घ्या तुम्ही नावं आणि निवडून द्या तुम्ही संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांचा धनुष्य बाणं, महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीची फेकून द्या घाण आणि वाढवा महाराष्ट्राचा मान.’ ‘नरेंद्र मोदी आहेत या देशाचा विकास करणारे स्ट्राँग मॅन, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींवर लावा तुम्ही बॅन.’ ‘पंतप्रधानपदाची जी आहे गादी, त्यावर चार जूननंतर बसणार आहेत, नरेंद्र मोदी.’ अशी कविता खासदार रामदास आठवले यांनी त्यांच्या भाषणावेळी सादर केल्या. ‘कोण म्हणतंय संविधान बदलणार, त्यांचे आम्ही थोबाड फोडणार’ बौद्ध, दलित, आंबेडकरी समाज मोदींच्या पाठीशी उभा आहे, असेही ते म्हणाले.

महिलांची गर्दी जास्त

या सभेला महिलांनीही मोठी गर्दी केली होती. महिलांनी जागा मिळेल त्या ठिकाणी बसून पंतप्रधान मोदी यांची सभा ऐकली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.