Kolhapur Lok Sabha : मोदींच्या थापांना पुन्हा बळी पडू नका; आमदार भास्कर जाधवांचं मतदारांना आवाहन
''निवडणुकीत ईव्हीएमचा धोका कायम आहे. त्याबाबत जागरुक राहिले पाहिजे. पहिल्या पाचशे मतात काही केले जात नाही. पण, दुसऱ्या पाचशेमध्ये हेराफेरी होण्याची शक्यता आहे.''
गडहिंग्लज : ‘लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यात १९० जागांसाठी मतदान झाले आहे. पण, कोल्हापुरात आलेल्या देशाच्या पंतप्रधानांनी भाजप (BJP) आताच दोनशेपार गेल्याचे सांगितले. काय फेकाफेक करायची याला काहीतरी मर्यादा आहे की नाही. २०१४ ला थापा मारून ते सत्तेवर आलेत. तेव्हा बळी पडलात. आता पुन्हा थापांना बळी पडू नका’, असे आवाहन आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी केले.
कोल्हापूर लोकसभा (Kolhapur Lok Sabha) मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारार्थ सभा झाली. याप्रसंगी जाधव बोलत होते. म. दुं. श्रेष्ठी विद्यालयाच्या मैदानावर ही सभा झाली. सतेज पाटील म्हणाले, ‘अलीकडच्या काळात वातावरण गढूळ झाले आहे. तुमची अस्मिता, स्वाभिमान जपायचा असेल तर शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) हे एकच उत्तर आहे.’
शाहू महाराज म्हणाले,‘गडहिंग्लज सर्वांना बरोबर घेऊन जाणारे शहर आहे. शहराच्या विकासाच्या दिशेने अधिक पावले टाकूया.’ शिवप्रसाद तेली यांनी स्वागत केले. यावेळी संजय पवार, नंदाताई बाभुळकर, स्वाती कोरी यांचीही भाषणे झाली.
ईव्हीएमचा धोका कायम...
भास्कर जाधव म्हणाले, ‘निवडणुकीत ईव्हीएमचा धोका कायम आहे. त्याबाबत जागरुक राहिले पाहिजे. पहिल्या पाचशे मतात काही केले जात नाही. पण, दुसऱ्या पाचशेमध्ये हेराफेरी होण्याची शक्यता आहे. याला उत्तर देण्यासाठी जास्तीत जास्त मतदान कसे होईल याकडे लक्ष द्या.’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.