Kolhapur Lok Sabha
Kolhapur Lok Sabhaesakal

Kolhapur Lok Sabha : 'सदाशिवराव मंडलिकांच्या वारसाला लोकसभेत पाठवून त्यांचा पांग फेडूया'; काय म्हणाले मुश्रीफ?

लोकनेते दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांनी कागलच्या जनतेच्या हितासाठी फार मोठे योगदान दिले आहे.
Published on
Summary

'कागल तालुक्यात मुश्रीफ गट, मंडलिक गट आणि राजे गट असे तिन्ही प्रमुख एकत्र आहेत. कागल तालुक्याची अस्मिता म्हणून या तालुक्यात मिळणारे मताधिक्य हे ऐतिहासिक असेल.’

बिद्री : ‘लादल्या गेलेल्या उमेदवाराविरोधात प्रा. संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांची लढाई आहे. निवडणूक म्हटली की टीकाटिप्पणी आणि आरोप- प्रत्यारोप होणारच. परंतु जे समाजकारणात, राजकारणात सक्रिय आहेत त्यांनीच अशा टीकाटिप्पणीवर आरोप करावेत. जे सक्रिय नसतील, त्यांनी त्या करू नयेत. राजकारणामध्ये एखादी संधी मिळते म्हणून राजकारण करणे वेगळे आणि सातत्याने जनतेच्या प्रवाहामध्ये राहून काम करणे हे वेगळे’, असे मत दूध साखर बँकेचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील (Babasaheb Patil) यांनी व्यक्त केले.

महायुतीचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांच्या प्रचारार्थ बिद्री (ता. कागल) आयोजित प्रचारसभेत पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) होते. पाटील म्हणाले, ‘लोकसभेची ही निवडणूक देश कुणाच्या हातात सुरक्षित राहील हे ठरवणारी आहे. स्वातंत्र्यानंतर साठ वर्षांचा कालखंड आणि नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळातील अलीकडच्या दहा वर्षांतील कालखंड यामधील फरक निश्चितच दिसून येणार आहे. कागल तालुक्यात मुश्रीफ गट, मंडलिक गट आणि राजे गट असे तिन्ही प्रमुख एकत्र आहेत. कागल तालुक्याची अस्मिता म्हणून या तालुक्यात मिळणारे मताधिक्य हे ऐतिहासिक असेल.’

Kolhapur Lok Sabha
Raju Shetti : 'लोकशाहीचा गळा घोटणाऱ्यांना मीच जाब विचारू शकतो, कारण माझ्या मिशीला कुठेही खरकटे लागलेले नाही'

पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘लोकनेते दिवंगत सदाशिवराव मंडलिक यांनी कागलच्या जनतेच्या हितासाठी फार मोठे योगदान दिले आहे. त्याबाबत आपण कृतज्ञता म्हणून त्यांचा पांग फेडण्यासाठी संजय मंडलिक यांना निवडून देऊया. कोल्हापूर लोकसभेचा राजा हा जनतेच्या मतपेटीतून आलेला फैसला ठरवेल. जिल्ह्यातील लोकहिताला प्राधान्य दिलेल्या दिवंगत मंडलिक यांच्या वारसाला लोकसभेत पाठवून त्यांचा पांग फेडूया.’

Kolhapur Lok Sabha
Ratnagiri Sindhudurg Lok Sabha : ठाकरेंना हार घातलेले निम्मे नारायण राणेंच्या संपर्कात; उदय सामंतांचा गौप्यस्फोट

या वेळी जिल्हा परिषद सदस्य मनोज फराकटे, कोल्हापूर जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे, आण्णासो पवार, चंद्रकांत पाटील, नेहा पाटील यांची भाषणे झाली. या वेळी ‘बिद्री’ चे संचालक रावसाहेब खिलारे, रंगराव पाटील- सुरूपली, एन. एस. चौगुले, बिद्रीचे सरपंच पांडुरंग चौगुले, नंदकुमार पाटील, उंदरवाडीचे मसू पाटील, ‘बिद्री’ चे माजी संचालक जगदीश पाटील, डी. एम. चौगुले, शहाजी गायकवाड, के. के. फराकटे, आनंदराव फराकटे, रमेश पाटील, चंद्रकांत पाटील, संजय पाटील आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()