'माझ्या कार्यकर्त्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला, तर गाठ माझ्याशी आहे'; चेतन नरकेंचा माजी आमदाराला थेट इशारा
''डॉ. नरके यांनी अडीच वर्षे गाव-वाड्यांवस्त्यांवर संपर्क मोहीम राबविली, तरीही त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून शाहू महाराजांसोबत राहण्याचा निर्णय घेतला.''
कोल्हापूर : `समतेचा विचार दिल्लीपर्यंत पोहोचविण्यासाठी या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (Shahu Chhatrapati Maharaj) यांच्यासाठी घटक पक्षांसह नरके गट एकत्र आल्याने त्यांच्या विजयाचा पाया करवीरमधून (Karveer) रचणार’, अशी ग्वाही ‘गोकुळ’चे संचालक डॉ. चेतन नरके यांनी दिली. ‘सत्तेच्या जोरावर माझ्या कार्यकर्त्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्यास माझ्याशी गाठ आहे’, असा इशाराही डॉ. नरके यांनी माजी आमदार चंद्रदीप नरके (Chandradeep Narke) यांचे नाव न घेता दिला.
महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) उमदेवार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रचारार्थ वाकरे फाटा (ता. करवीर) येथे झालेल्या नरके गटाच्या मेळाव्यात डॉ. नरके यांनी महाविकास आघाडीसोबत राहण्याचा निर्णय जाहीर केला. दरम्यान, ‘डॉ. नरके यांनी अडीच वर्षे गाव-वाड्यांवस्त्यांवर संपर्क मोहीम राबविली, तरीही त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून शाहू महाराजांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यांची ही मेहनत आणि कष्ट वाया जाऊ देणार नाही. त्यांच्या मागे मी व आमदार पी. एन. पाटील पहाडासारखे उभे राहू’, असे आश्वासन आमदार सतेज पाटील यांनी दिले.
डॉ. नरके म्हणाले, ‘भविष्यातील राजकीय वाटचालीची दिशा कोणती असेल, हे ठरविणारा हा मेळावा आहे. लोकसभा लढवायची म्हणून गेल्या अडीच वर्षांपासून मी जिल्हाभर संपर्क दौरा केला. सामान्य माणसांशी नाळ जोडली. त्यांच्या हृदयात स्थान मिळविले. मेळाव्याला झालेली गर्दी माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची आहे. राजर्षी शाहू महाराजांचे समतेचे विचार हे संपूर्ण समाजाला आणि देशाला तारणारे आहेत. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज हे अतिशय सक्षमपणे आणि प्रभावीपणे समतेच्या विचारांचा हा वारसा पुढे चालवित आहेत.
येथून पुढे आमदार पी. एन. पाटील व आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहकार आणि राजकारणात काम करू.’ शाहू महाराज म्हणाले, ‘चेतन नरके यांचा आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनुभव मोठा आहे. त्यांनी उद्योग आणि शेतीसंबंधी केलल्या आंतरराष्ट्रीय कामांचा अनुभव कोल्हापूरच्या विकासाचा आराखडा मांडताना उपयुक्त ठरणार आहे. त्यांचे स्वप्न हेच माझे व्हिजन आहे.’
छत्रपतींविषयी प्रचंड आदर
‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष अरुण नरके म्हणाले, ‘श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्याविषयी प्रचंड आदर आहे. ५० वर्षांची मैत्री आहे. केएसएमध्ये मी पदाधिकारी आहे. कौटुंबिक स्नेह आहे. त्यांच्या हस्ते माझा अमृतमहोत्सवी वाढदिवसाला सत्कार झाला होता. इतके ऋणानुबंध आहेत. म्हणूनच डॉ. चेतन नरकेंना थांबविले.’
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.