Narayan Rane
Narayan Raneesakal

केंद्रीयमंत्री नारायण राणेंनी शिवसेना का सोडली? बाळासाहेब ठाकरेंचा दाखला देत स्वत:च सांगितलं 'हे' कारण

आता प्रकल्‍प हवेत, नोकऱ्या हव्यात की रोजगार हिरावून घेणारा खासदार हवा याचे उत्तर तरुणांनीच द्यायचे आहे.
Published on
Summary

'विरोधी पक्षाचे दहा वर्ष खासदार आहेत. कोणतेही विकासकामे सांगत नाहीत तर राणे कुटुंबीयांवर टीका करत आहेत.'

नांदगाव : महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात विनायक राऊत यांनी केलेल्या पडद्या मागच्या मागणीमुळेच रायगड, रत्‍नागिरीतील चौपदरीकरणाचे काम रखडले असल्‍याचा आरोप केंद्रीयमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला. दोडामार्गप्रमाणेच कुडाळ, कणकवली आणि वैभववाडी येथेही पाचशेपेक्षा अधिक कारखाने आणणार असल्‍याची ग्‍वाही त्‍यांनी दिली.

Narayan Rane
Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

असलदे येथे महायुतीची (Mahayuti) प्रचारसभा झाली. यात राणे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले. यावेळी आमदार नितेश राणे, भाजप उपाध्यक्ष सुरेश सावंत, भाजप तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री, संजय देसाई, तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

राणे म्‍हणाले, ‘राऊत यांनी चिपी विमानतळाला (Chipi Airport) विरोध केला. अनेकांना रोजगार देणाऱ्या सी वर्ल्ड प्रकल्‍पाही विरोध केला. रत्‍नागिरी जिल्ह्यात महामार्गाच्या काम का रखडले, हे जनतेने राऊत यांना विचारायला हवे. जैतापूर व नाणार प्रकल्पाला विरोध केल्‍याने या प्रकल्‍पांची कामे रखडली आहेत. पर्यायाने शेकडो तरुणांना नोकऱ्याही मिळालेल्‍या नाहीत. त्यामुळे आता प्रकल्‍प हवेत, नोकऱ्या हव्यात की रोजगार हिरावून घेणारा खासदार हवा याचे उत्तर तरुणांनीच द्यायचे आहे.’

Narayan Rane
सांगलीत 'वंचित'चा तिसऱ्यांदा 'यू-टर्न'! शेंडगेंना केलं 'एप्रिल फूल', विशाल पाटलांना दिला पाठिंबा; आंबेडकरांच्या बदलत्या भूमिकेची चर्चा

राणे पुढे म्‍हणाले, ‘विरोधी पक्षाचे दहा वर्ष खासदार आहेत. कोणतेही विकासकामे सांगत नाहीत तर राणे कुटुंबीयांवर टीका करत आहेत. राऊत हे मुंबई येथे नगरसेवक होते. त्‍यावेळी तेथील मीडिया व पोलिसांना विचारा राऊतांविरोधात किती तक्रारी होत्या. आता आपल्याला जिल्ह्याचा विकास करायचा आहे. मोठे उद्योग आणायचे आहेत.’

दोडामार्गप्रमाणे कुडाळ, कणकवली, वैभववाडी येथे जागा मिळाली तर पाचशेपेक्षा अधिक कारखाने आणणार. त्याचबरोबर रुग्‍णालयीन साहित्य बनवणारे कारखाने दोडामार्ग येथे आणत आहोत. फळप्रक्रिया उद्योग आणण्याबरोबर प्रशिक्षण केंद्र ओरोसला व टेक्निकल सेंटर उभारून आधुनिक मशिनरी कशा चालवायच्या याचे शिक्षण दिले जाईल व ते शिक्षण घेतल्यावर दोडामार्ग येथे कारखान्यात नोकऱ्या मिळतील. मी उध्दव ठाकरे यांच्याशी जमणार नसल्याने शिवसेना सोडली असून, मी जो काय आहे, बाळासाहेब ठाकरेंमुळे आहे.’

Narayan Rane
कार्यालयावरील उदय सामंतांचे फोटो हटवताच किरण सामंतांचं स्पष्टीकरण; म्हणाले, आमच्यात धुसफूस नव्हे तर..

कासार्डे जिल्‍हा परिषद गटाच्या या निर्धान सभेवेळी भाजप जिल्‍हा उपाध्यक्ष सुरेश सावंत, भाजप तालुकाध्यक्ष संतोष कानडे, मिलिंद मेस्त्री, तालुका सरचिटणीस पंढरी वायंगणकर, माजी उपसभापती प्रकाश पारकर, भाजप महिला तालुकाध्यक्ष हर्षदा वाळके, महिला जिल्हा सरचिटणीस पूजा जाधव, माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम, नांदगाव सरपंच रविराज मोरजकर, ओटव सरपंच रुहिता तांबे, कासार्डे सरपंच निशा नकाशे, दारूम सरपंच तेजस्वनी लिंगायत, तोंडवली-बावशी सरपंच मनाली गुरव, असलदे सरपंच चंद्रकांत डामरे, कोळोशी सरपंच गुरुनाथ आचरेकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.