Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Kiran Samant
Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Kiran Samantesakal

कार्यालयावरील उदय सामंतांचे फोटो हटवताच किरण सामंतांचं स्पष्टीकरण; म्हणाले, आमच्यात धुसफूस नव्हे तर..

किरण सामंत यांनी आपल्या कार्यालयावरील उदय सामंत यांचे फोटो हटवल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले होते.
Published on
Summary

शिवसेना जिल्हासंपर्क कार्यालयावरील बॅनर हटवला असून तिथे किरण सामंत संपर्क कार्यालय असा बॅनर लावण्यात आला आहे.

रत्नागिरी : पालकमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांचे मोठे बंधू किरण सामंत यांनी आपल्या कार्यालयावरील उदय सामंत यांचे फोटो हटवल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले होते. किरण सामंत (Kiran Samant) यांनी फोटो हटवले म्हणजे धुसफूस नव्हे, असे सांगून राणेंचा प्रचारासाठी लांजा येथे दौरा करून कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देणार असल्याचे स्पष्ट केले.

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Kiran Samant
Sangli Lok Sabha : सांगलीच्या जागेबाबत शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, याची चर्चा न होता थेट टीव्हीवरच..

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा (Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha) मतदारसंघाची किरण सामंत यांना उमेदवारी मिळावी, अशी मागणी मंत्री सामंत यांच्याकडून केली जात होती. पण केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना उमेदवारी जाहीर झाली. काल (ता. १) अचानक किरण सामंत यांच्या रत्नागिरीतील दोन कार्यालयावरील पालकमंत्री उदय सामंत यांचे फोटो काढून टाकण्यात आले.

Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha Kiran Samant
सांगलीत 'वंचित'चा तिसऱ्यांदा 'यू-टर्न'! शेंडगेंना केलं 'एप्रिल फूल', विशाल पाटलांना दिला पाठिंबा; आंबेडकरांच्या बदलत्या भूमिकेची चर्चा

शिवसेना जिल्हासंपर्क कार्यालयावरील बॅनर हटवला असून तिथे किरण सामंत संपर्क कार्यालय असा बॅनर लावण्यात आला आहे. त्यामुळे काल दिवसभर मंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्यामध्ये फूट पडल्याची चर्चा रंगली. पालकमंत्री सामंत यांनी पत्रकारांच्या प्रश्नाना उत्तर देताना जर किरण सामंत नाराज असतील त्यांची नाराजी दूर करू असे सांगितले. किरण सामंत यांनीही भावांमध्ये धुसफूस नसल्याचे स्पष्ट केले. हा गोंधळ आज विरला असून त्यावर पडदा पडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.