Finance Minister Dr. C. D. Deshmukh
Finance Minister Dr. C. D. Deshmukhesakal

Finance Minister : मुंबई महाराष्ट्रात राहण्यासाठी राजीनामा देणारे अर्थमंत्री; थेट पंतप्रधानांना सुनावलं अन्..

शेकडो जणांनी आपलं रक्त सांडलं, जनतेच्या एकजुटीने मग्रूर सत्तेला धडा शिकवला आणि संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली.
Published on
Summary

पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १९५६ च्या सुरुवातीस मुंबई केंद्रशासित करण्याचा इरादा स्पष्ट केला होता.

-सतीश पाटणकर

१ मे महाराष्ट्र दिन (Maharashtra Day). लाखो जणांनी आंदोलने केली, शेकडो जणांनी आपलं रक्त सांडलं, जनतेच्या एकजुटीने मग्रूर सत्तेला धडा शिकवला आणि संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली. जनतेचं आंदोलन सुरू होतं. मात्र, काही मराठी पुढारी होते जे आपली खुर्ची वाचवण्याच्या मागे लागले होते व चळवळीला विरोध करत राहिले. मात्र, एक नेता असा होता ज्याने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा, मराठी माणसावरचा अन्याय दूर व्हावा म्हणून थेट पंतप्रधानांना सुनावलं, देशाच्या अर्थमंत्रिपदाचा (Finance Minister) सहज राजीनामा देऊन टाकला. ते होते आधुनिक रामशास्त्री म्हणून ज्यांना ओळखलं गेलं असे डॉ. सी. डी. देशमुख.

Finance Minister Dr. C. D. Deshmukh
Sangli Lok Sabha : 'चंद्रहार पाटलांना विजयी केले, तर विश्‍वजित कदमांना वाघ ही पदवी देऊ'; संजय राऊतांची मोठी घोषणा

भारत सरकारातील पंतप्रधान नेहरू यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते. सी. डी. देशमुख (Dr. C. D. Deshmukh) हे एक सनदी अधिकारी होते. ते १९३९ ला भारतीय रिझर्व बँकेच्या सेवेत अधिकारी म्हणून रुजू झाले. १ जानेवारी १९४९ ला रिझर्व बँकेचे राष्ट्रीयीकरण त्यांच्याच कार्यकाळात झाले. १९५० ते १९५६ या काळात चिंतामणराव स्वतंत्र सार्वभौम भारताचे पहिले अर्थमंत्री होते. पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी १९५६च्या सुरुवातीस मुंबई केंद्रशासित करण्याचा इरादा स्पष्ट केला होता.

जवाहरलाल नेहरूंच्या (Jawaharlal Nehru) वक्तव्याने आंदोलक अधिकच भडकले. या सर्व घटनांचे साक्षीदार बुद्धिवान अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख होते. या घटनेनंतर त्यांचा स्वाभिमान, मराठी बाणा जागवला आणि केंद्रीय अर्थमंत्रिपदाच्या राजीनाम्याचा विचार देशमुख यांच्या डोक्यात घोळू लागला. २५ जुलै १९५६ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांशी चर्चा न करता पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मुंबई केंद्रशासित करण्याचा महाराष्ट्रविरोधी निर्णय घेतला.

Finance Minister Dr. C. D. Deshmukh
Ratnagiri-Sindhudurg Lok Sabha : हॅट्ट्रिक तर होणार; पण पराभवाची की विजयाची? विनायक राऊत विरुद्ध नारायण राणेंमध्ये सामना

सी. डी. देशमुख यांच्या अस्वस्थतेचा स्फोट झाला आणि त्यांनी अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर लोकसभेत केलेल्या घणाघाती भाषणात नेहरूंचा हुकूमशहा अशा शब्दांत उल्लेख केला. देशमुख यांनी अर्धा तास केलेल्या भाषणाने सारा देश हादरून गेला. महाराष्ट्रतील लोकांनी त्यांना डोक्यावर घेतले.

(लेखक मुख्यमंत्र्याचें माजी माहिती अधिकारी आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.