मागील निवडणुकीत झालेल्या चुका सुधारल्या, आता शेतकऱ्यांचा आवाज बनून लोकसभेत जाणार; राजू शेट्टींना विश्वास
‘भाजपप्रणित एनडीए व कॉँग्रेसप्रणित इंडिया या दोन्ही आघाड्यांकडून विचारणा होत आहे.'
कुरुंदवाड : ‘मी लोकसभेच्या रिंगणात स्वाभिमानी पक्षाच्या वतीने उभा राहणार असून त्यादृष्टीने आमचे काम सुरू आहे. मागील निवडणुकीत झालेल्या चुका सुधारण्यात आल्या आहेत. शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, बारा बलुतेदार, अलुतेदार सगळेच आज त्रस्त आहेत. त्यांचा आवाज बनून मी लोकसभेत पुन्हा जाणार,’ असा विश्वास माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी मतदारसंघ संपर्क दौऱ्यात व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Elections) पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी आज कुरुंदवाडसह परिसरातील गावात संपर्क दौरा करत गावागावांतील प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. शेट्टी यांनी बुबनाळ, आलास, बस्तवाड, राजापूर, खिद्रापूर, राजापूरवाडी, मजरेवाडी, कुरुंदवाड व अकिवाट येथे भेटीगाठी घेतल्या. गावोगावी महिलांनी त्यांचे औक्षण केले.
गावातील ग्रामदैवतांचे दर्शन व नंतर गावागावांतील आजी -माजी सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सहकारी संस्थांचे पदाधिकारी, ज्येष्ठ नागरिक, युवक शेतकरी यांच्याशी संवाद असा त्यांचा भेटीगाठीचा दिनक्रम राहिला. यावेळी शेट्टी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, ‘भाजपप्रणित एनडीए व कॉँग्रेसप्रणित इंडिया या दोन्ही आघाड्यांकडून विचारणा होत आहे.
मात्र सत्ताधारी भाजपची मी २०१५ सालीच साथ सोडली. त्यामुळे त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच नाही. स्वाभिमानी पक्षाची स्थापना झाली असून त्याची नोंदणीही आहे. या पक्षाच्या माध्यमातून आजपर्यंतच्या सर्व निवडणुका लढवल्या आहेत.’ यावेळी सावकर मादनाईक, सचिन शिंदे, शैलेश आडके, अजित दानोळे गौतम किणिंगे, सतिश निडगुंदे,प्रशांत कुंभोजे आदींसह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.