Kalyan Lok Sabha : कल्याण लोकसभा मतदारसंघात झाले एकूण 50.12 टक्के मतदान; निवडणूक निर्णय अधिकारी सातपुतेंची माहिती

लोकसभा निवडणुकीच्या (Dombivli Lok Sabha Elections) पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी 20 मे रोजी पार पडले.
Kalyan Lok Sabha
Kalyan Lok Sabha esakal
Updated on
Summary

कल्याण लोकसभा मतदारसंघात एकूण 50.12 टक्के मतदान (Voting) झाले असून पुरुष मतदारांचे प्रमाण 52.19 टक्के, महिला मतदारांचे प्रमाण 47.75 टक्के तर इतर मतदारांचे प्रमाण 21.63 टक्के इतके आहे.

डोंबिवली : लोकसभा निवडणुकीच्या (Dombivli Lok Sabha Elections) पाचव्या टप्प्यातील मतदान सोमवारी 20 मे रोजी पार पडले. कल्याण लोकसभा मतदारसंघात (Kalyan Lok Sabha Constituency) एकूण 50.12 टक्के मतदान झाली असल्याची माहिती कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांनी दिली.

कल्याण लोकसभा मतदारसंघात एकूण 50.12 टक्के मतदान (Voting) झाले असून पुरुष मतदारांचे प्रमाण 52.19 टक्के, महिला मतदारांचे प्रमाण 47.75 टक्के तर इतर मतदारांचे प्रमाण 21.63 टक्के इतके आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे : 140 अंबरनाथ - एकूण मतदारांची संख्या : 3 लाख 53 हजार 554, मतदान केलेले मतदार : 1 लाख 66 हजार 407, (एकूण टक्केवारी - 47.07 %.) पुरुष मतदार संख्या : 1 लाख 89 हजार 844, मतदान केलेले पुरुष मतदार : 82 हजार 248, ‍ महिला मतदार : 1 लाख 63 हजार 654, मतदान केलेल्या महिला मतदार : 74 हजार 140, इतर मतदार : 56, मतदान केलेले इतर मतदारांची संख्या : 21.

Kalyan Lok Sabha
Latur 12th Exam Result : लातूर विभागाचा पॅटर्नचं वेगळा! यंदाही मुली ठरल्या अव्वल, विभागाचा 92.36 टक्के निकाल

141 उल्हासनगर - एकूण मतदारांची संख्या : 2 लाख 57 हजार 367. मतदान केलेले मतदार : 1 लाख 31 हजार 505, (एकूण टक्केवारी - 51.10 %.) पुरुष मतदार संख्या : 1 लाख 39 हजार 848, मतदान केलेले पुरुष मतदार : 74 हजार 877, ‍ महिला मतदार संख्या : 1 लाख 17 हजार 422, मतदान केलेले महिला मतदार : 56 हजार 606, इतर मतदार संख्या : 97, मतदान केलेले इतर मतदार : 22.

142 कल्याण पूर्व - एकूण मतदारांची संख्या : 2 लाख 99 हजार 380, मतदान केलेले मतदार : 1 लाख 56 हजार 235 (एकूण मतदानाची टक्केवारी - 52.19 %). पुरुष मतदारांची एकूण संख्या : 1 लाख 59 हजार 289, मतदान केलेल्या पुरुष मतदारांची संख्या : 87 हजार 784, महिला मतदारांची एकूण संख्या : 1 लाख 39 हजार 684, मतदान केलेल्या महिला मतदारांची संख्या : 68 हजार 370, इतर मतदारांची एकूण संख्या : 407. मतदान केलेल्या इतर मतदारांची संख्या : 81.

Kalyan Lok Sabha
Pune 12th Results : बारावी निकालात पुणे विभागीय मंडळ राज्यात तिसऱ्या क्रमांकावर; दोन लाख 29 हजार विद्यार्थी झाले उत्तीर्ण

143 डोंबिवली - एकूण मतदारांची संख्या : 2 लाख 75 हजार 110, मतदान केलेले मतदार : 1 लाख 42 हजार 142 (मतदानाची टक्केवारी - 51.67 %). पुरुष मतदारांची एकूण संख्या : 1 लाख 43 हजार 196, मतदान केलेले पुरुष मतदार : 78 हजार 023, ‍ महिला मतदारांची एकूण संख्या : 1 लाख 21 हजार 914, मतदान केलेल्या महिला मतदार : 64 हजार 119, इतर मतदारांची संख्या : 0, मतदान केलेल्या इतर मतदारांची संख्या : 0).

144 कल्याण ग्रामीण - एकूण मतदारांची संख्या : 4 लाख 53 हजार 149, मतदान केलेल्या एकूण मतदारांची संख्या : 2 लाख 31 हजार 162 (एकूण मतदानाची टक्केवारी – 51.01 %). पुरुष मतदारांची एकूण संख्या : 2 लाख 48 हजार 124, मतदान केलेले पुरुष मतदार : 1 लाख 32 हजार‍ 216, महिला मतदारांची एकूण संख्या : 2 लाख 04 हजार 902, मतदान केलेल्या महिला मतदार : 98 हजार 910, इतर मतदार : 123, मतदान केलेल्या इतर मतदारांची संख्या : 36.

Kalyan Lok Sabha
कॅफेत गुंगीचं औषध देऊन मुलीवर बलात्कार प्रकरणी Hang On Cafe चालकास अटक; 'पोक्सों'तर्गत पोलिसांची कारवाई

149 मुंब्रा कळवा - एकूण मतदारांची संख्या : 4 लाख 43 हजार 661, मतदान केलेल्या एकूण मतदारांची संख्या : 2 लाख 16 हजार 159 (एकूण मतदानाची टक्केवारी - 48.72 %). पुरुष मतदारांची एकूण संख्या : 2 लाख 37 हजार 113, मतदान केलेल्या पुरुष मतदारांची संख्या : 1 लाख 18 हजार ‍013, महिला मतदारांची एकूण संख्या : 2 लाख 06 हजार 445, मतदान केलेल्या महिला मतदारांची संख्या : 98 हजार 136, इतर मतदारांची एकूण संख्या : 103, मतदान केलेल्या इतर मतदारांची संख्या : 10)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.