Loksabha Election 2024 : भाजपने दोनशे जागा जिंकून दाखवाव्यात ; ममता बॅनर्जी यांचे आव्हान

‘‘भाजप लोकसभा निवडणुकीमध्ये ‘४०० पार’ असा नारा देत आहे पण मी भाजपला आव्हान देते की त्यांनी किमान २०० जागांवर तरी विजयी होऊन दाखवावे,’’ असे आव्हान पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी रविवारी भाजपला दिले.
Loksabha Election 2024
Loksabha Election 2024sakal
Updated on

कृष्णानगर : ‘‘भाजप लोकसभा निवडणुकीमध्ये ‘४०० पार’ असा नारा देत आहे पण मी भाजपला आव्हान देते की त्यांनी किमान २०० जागांवर तरी विजयी होऊन दाखवावे,’’ असे आव्हान पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी रविवारी भाजपला दिले. कृष्णानगर येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेमध्ये त्या बोलत होत्या. ममता बॅनर्जी यांना दुखापत झाल्यामुळे त्या काही काळ प्रचारापासून दूर होत्या. ममता यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाल्यानंतर त्यांनी रविवारपासून पुन्हा प्रचारसभा घ्‍यायला सुरुवात केली आहे.

प. बंगालमध्ये ‘इंडिया’आघाडी नाही

ममता यांनी विरोधकांच्या इंडिया आघाडीतील घटक पक्षांवरही टीका केली. ‘‘पश्‍चिम बंगालमध्ये विरोधकांची इंडिया आघाडी नाही, कारण भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेसने येथे भाजपशी हात मिळवणी केली आहे,’’ असा आरोपही ममता यांनी यावेळी बोलताना केला.

Loksabha Election 2024
Loksabha Election 2024 : खैरे-दानवे यांच्यात दिलजमाई ; लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दोन तास चर्चा

मोईत्रा यांची पाठराखण

तृणमूल काँग्रेसच्या कृष्णानगर येथील उमेदवार आणि निलंबित खासदार महुआ मोईत्रा यांच्या प्रचारासाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये ममता यांनी मोईत्रा यांची बाजू घेत भाजपवर हल्लाबोल केला. ‘‘ आमच्या पक्षाच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी भाजपविरोधात आवाज उठवला म्हणून त्यांना निलंबित करण्यात आले,’’ असा आरोप ममता यांनी यावेळी बोलताना केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.