Uddhav Thackeray : महाराष्ट्र तुम्हाला मातीत गाडेल;उद्धव ठाकरे यांचा मोदी-शहा यांना ‘इंडिया’च्या सभेत इशारा

‘‘शिवाजी पार्क येथे भाषणे करायला आणि सभेला भाडोत्री माणसे घेऊन येणारे लोक उद्धव ठाकरे यांना संपविण्याची भाषा करीत आहेत. तसा प्रयत्न तर करून बघा, महाराष्ट्र तुम्हाला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही,’’ असे आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिले.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeraysakal
Updated on

मुंबई : ‘‘शिवाजी पार्क येथे भाषणे करायला आणि सभेला भाडोत्री माणसे घेऊन येणारे लोक उद्धव ठाकरे यांना संपविण्याची भाषा करीत आहेत. तसा प्रयत्न तर करून बघा, महाराष्ट्र तुम्हाला मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही,’’ असे आव्हान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिले. ‘शाहू-फुले-आंबेडकर’ यांचा हा महाराष्ट्र आम्ही ‘शहा-मोदी आणि अदानी’ यांचा होऊ देणारा नाही, असे प्रतिपादनही त्यांनी या वेळी केले.

इंडिया’ आघाडीच्या मुंबईमध्ये शुक्रवारी झालेल्या प्रचार सांगता सभेत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपवर जोरदार टीका केली. भाजप आणि शिवसेना हे भाकड, भेकड आणि गद्दार आहेत, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी टीका केली. मोदी यांची पंतप्रधान म्हणून महाराष्ट्रातील शेवटची सभा असणार आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

घराणेशाहीवरून होणाऱ्या टीकेला प्रत्युत्तर देताना ठाकरे म्हणाले, ‘‘आमचे घराणे काढणारे मोदी यांचे घराणे मला माहीत नाही, परंतु माझ्या सात पिढ्यांनी देशासाठी योगदान दिले आहे.’’ स्वातंत्र्य चळवळीत आणि संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात तुमचा पक्ष किंवा तुमचे पूर्वज कुठेही नव्हते. मला नकली संतान म्हणताना मला प्रमाणपत्र देणारे तुम्ही काय ब्रह्मदेवाचे बाप आहात का? असा सवालही त्यांनी यावेळी विचारला.

Uddhav Thackeray
Narendra Modi : ‘ते’ राम मंदिरावर बुलडोझर चालवतील;मोदींची ‘सप’, ‘काँग्रेस’वर टीका, ‘कमळा’ला मतदानाचे आवाहन

शिवसेनेची घराणेशाही चालत नाही, मात्र गद्दारांची घराणेशाही चालले. शिवसेना-भाजप युतीचा पाय रचणाऱ्या प्रमोद महाजन यांच्या मुलीला उमेदवारी नाकारून काय साधले? असा सवाल करत, प्रमोद महाजन हयात असते, तर तुम्ही राजकारणात दिसला नसता, असा दावा ठाकरे यांनी केला. ‘‘महाराष्ट्राला भिकारी करायला निघालेल्या या पंतप्रधानांना या पदावर बसण्यासाठी मदत केली याचा पश्चात्ताप होत आहे. बाळासाहेब ठाकरेंचे नाव घ्यायची यांची योग्यता नाही,’’ असेही ते म्हणाले.

दुफळी माजवू नका

‘‘हिंदू-मुस्लिम अशी दुफळी माजवू नका. गेल्या दहा वर्षांतील काम सांगा आणि मते मागा,’’ असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी दिले. ठाकरे यांनी कोणाचेही नाव न घेता, ‘‘सगळेच गुजराती वाईट नाहीत, परंतु तुमच्यामुळे मस्तवाल झालेले काही आहेत. त्यांना परत गुजरातला पाठवून देणार आहोत,’’ असा इशारा दिला. देशाला तोडण्याचे काम भाजपने केले, त्याला जोडण्याचे काम राहुल गांधींनी केले, असे प्रतिपादनही त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.