Varanasi Lok Sabha Election Result 2024 : वाराणसीत मोदींची हॅट्रिक, ...पण मताधिक्य घटलं; विरोधी उमेदवाराच्या मतांमध्ये भरघोस वाढ

Varanasi Election Results : वाराणसीमध्ये एकूण सात उमेदवार रिंगणात आहेत. मतदारसंघामध्ये एकूण मतदान १९ लाख ६२ हजार ६९९ इतके मतदार आहेत. त्यातले पुरुष मतदार १० लाख ६५ हाजर ३४३ तर महिला मतदार ८ लाख ९७ हजार २२१ इतके आहेत.
Varanasi Constituency
Varanasi Constituencyesakal
Updated on

कVaranasi Constituency Lok Sabha Election Result : देशामध्ये सगळ्यात जास्त चर्चिला जाणारा लोकसभा मतदारसंघ म्हणजे वाराणसी. या मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा निवडणुकीच्या मैदानात उतरले होते. यावेळी भाजपने वाराणसीमधून १० लाखांचं मताधिक्य घेण्याचा संकल्प केला होता.

Varanasi Election Results

वाराणसीमध्ये काँग्रेसने अजय राय यांना मैदानात उतरवलं होतं. राय हे मागच्या तीन टर्मपासून लोकसभा लढत आहेत. तर बसपाने अतहर जमाल यांना उमेदवारी देऊन मुस्लिम कार्ड खेळलं होतं. कारण काशीमध्ये साधारण १३ टक्के मुस्लिम मतदान आहे.

वाराणसी लोकसभा मतदारसंघामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजयाची हॅट्रिक केली आहे. मोदींनी ६ लाख १२ हजार ९७० मतं घेतली आहे. तर १ लाख ५२ हजार ५१३ मतांनी त्यांचा विजय झाला. मोदींचे प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस उमेदवार अजय राय यांना ४ लाख ६० हजार ४५७ मतं घेतली.

उमेदवारांना पडलेली मतं (लोकसभा २०२४)

  • नरेंद्र मोदी- ६,१२,९७० (भाजप)

  • अजय राय- ४,६०,४५७ (काँग्रेस)

  • अथेर जमाल लारी- ३३,७६६ (बसपा)

  • विजयी उमेदवाराचे मताधिक्य- १,५२,५१३

वाराणसीमध्ये एकूण सात उमेदवार रिंगणात आहेत. मतदारसंघामध्ये एकूण मतदान १९ लाख ६२ हजार ६९९ इतके मतदार आहेत. त्यातले पुरुष मतदार १० लाख ६५ हाजर ३४३ तर महिला मतदार ८ लाख ९७ हजार २२१ इतके आहेत. मतदारसंघात पाच विधानसभेचे भाग येतात. यात रोहनिया, दक्षिण शहर, उत्तर शहर, कँट आणि सेवापुरी या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. त्यापैकी चार भाजपकडे आहेत तर केवळ एक रोहनियाची जागा अपना दल पक्षाकडे आहे.

Varanasi Constituency
Ajit Pawar NCP : अरुणाचलमध्ये अजित पवारांचे तीन उमेदवार विजयी; राष्ट्रीय पक्ष होण्याच्या दिशेने वाटचाल

२०१९ मध्ये कोणाला किती मतं मिळाले?

नरेंद्र मोदी- ६,७४,६६४

शालिनी यादव- १,९५,१५९

अजय राय- १,५२,५४८

विजीय उमेदवाराचे मताधिक्य- ४,७९,५०५

Varanasi Constituency
Arvind Kejriwal: अरविंद केजरीवालांनी केलं तिहार कारागृहात आत्‍मसमर्पण; म्हणाले, 'मी या हुकूमशाहीविरुद्ध...'

स्थानिक मुद्दे

  • शहरी भागांमध्ये वाहतुकीची समस्या आहे. त्यामुळे तातडीने ओव्हरब्रिज व्हावेत, अशी मागणी आहे.

  • गल्ल्यांमध्ये पिण्याचं पाणी आणि गटारींसारख्या मुलभूत समस्या आहेत

  • गटाराचं पाणी थेट गंगेमध्ये सोडलं जात आहे, त्याबद्दल नागरिकांमध्ये नाराजी आहे

  • दक्षिण भारतासाठी नियमित स्वरुपात रेल्वेगाड्या सोडण्याची मागणी आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.