Vishal Patil With VBA: विशाल पाटलांना वंचितकडून उमेदवारी मिळणार का? आंबेडकरांचे संकेत

महाविकास आघाडीमध्ये सांगलीची जागा शिवसेनेकडं गेल्यानं काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्ते आणि नेत्यांना मोठा झटका बसला आहे.
Prakash Ambedkar
Prakash Ambedkar
Updated on

मुंबई : महाविकास आघाडीमध्ये सांगलीची जागा शिवसेनेकडं गेल्यानं काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्ते आणि नेत्यांना मोठा झटका बसला आहे. या जागेवरुन काँग्रेसकडून विशाल पाटील हे इच्छुक उमेदवार होते. पण आता त्यांचा पत्ता कट झाला आहे.

पण आता त्यांना वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, कारण याबाबत खुद्दा वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सुतोवाच केले आहेत. (Vishal Patil may contest lok sabha election on VBA ticket Prakash Ambedkar Hints about it)

Prakash Ambedkar
Loksabha Election 2024: गुजरात ते उत्तर प्रदेशात भाजपसाठी ठाकुरांचं मोठं आव्हान; समाजाची काय आहे नाराजी?

आंबेडकर म्हणाले, "काँग्रेसनं ठरवलं पाहिजे की महाराष्ट्रात त्यांचं अस्तित्व ठेवायचं आहे की नाही. सांगलीत शिवसेनेचं काहीच नव्हतं पण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मिळून ती जागा घेतली. आज सकाळीच माझ्याकडं विशाल पाटील येऊन गेले, त्यांनी चर्चाही केली. (Marathi Tajya Batmya)

पण लवकरच ते निर्णय घेतील अशी मी अपेक्षा बाळगतो. पाटील यांचा निर्णय झाल्यानंतर आम्ही सांगू असं सांगत आंबेडकर यांनी त्यांच्या उमेदवारीबाबत बोलणं टाळलं.

Prakash Ambedkar
Shashikant Shinde: साताऱ्यातून शशिकांत शिंदेंच्या नावावर शिक्कामोर्तब; शरद पवारांनी जाहीर केली उमेदवारी

मी अजून विशाल पाटील यांना आग्रह केलेला नाही किंवा सूचना केलेली नाही. पण त्याचं म्हणणं ऐकून घेतलं आणि त्यांना सांगितलं की, फॉर्म भरल्यानंतर आपण ठरवू, असंही यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. (Latest Marathi News)

Prakash Ambedkar
Anjali Damania: "आखिर कहना क्या चाहते हो?" दमानियांचा राज ठाकरेंना सवाल

दरम्यान, काँग्रेसच्या अंतर्गत सर्व्हेमध्ये तसेच स्थानिक नेते विश्वजीत कदम यांनी देखील सांगलीत विशाल पाटील यांच्या विजयाची खात्री व्यक्त केली आहे. विशाल पाटील हे गेल्या दहा वर्षांपासून सांगलीत लोकसभेसाठी तयारी करत आहेत. त्यांचा चांगला जनसंपर्क आहे, तसेच वसंतदादा पाटील यांचे ते नातू असल्यानं सांगली हा काँग्रेसचा गड मानला जातो.

तर शिवसेनेचं सांगलीत स्थान नाही. पण तरीही जागा वाटपात मविआतील तिन्ही पक्षांचं एकमत होण्यापूर्वीच शिवसेनेनं डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आणि आता त्यावर अंतिम शिक्कामोर्तब झालं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.