Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

देशात सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात चांगलाच रंग चढायला लागला आहे.
Navneet Rana
Navneet Rana
Updated on

झहिराबाद : देशात सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात चांगलाच रंग चढायला लागला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून काँग्रेसलाच टार्गेट केलं जात आहे.

यात आता भाजपच्या अमरावती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार नवनीत राणा यांनी तेलंगणात एका प्रचार सभेत काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं, हेच सांगायला मी इथं आले आहे, असं विधान केलं. त्यांच्या या विधानामुळं वाद होण्याची शक्यता आहे. (Voting for Congress means voting for Pakistan says bjp Navneet Rana at Telangana)

झहिराबाद मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार बीबी पाटील यांच्या प्रचार रॅलीत नवनीत राणा या एएनआयच्या प्रतिनिधीशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या, गेल्या पाच वर्षात बीबी पाटील यांनी आपल्या मतदारसंघात काय काम केलंय हे मी पाहिलं आहे. (Latest Marathi News)

भाजपनं दिलेला ४०० पारचा नारा पूर्ण होईलच या ४०० पैकी झहिराबादची एक जागा असेल. देशासाठी एकच गोष्ट गरजेची आहे की नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत. तसेच काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं आहे, हाच विरोध करण्यासाठी मी आज इथं आले आहे. (Marathi Tajya Batmya)

Navneet Rana
Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

आज जर लालू प्रसाद यांचं विधान ऐकलं असेल तर त्यांनी म्हटलं की, मुस्लिमांना आम्ही आरक्षण देऊ, ते आरक्षण संपवण्याचं बोलत आहेत. पण मोदी सांगतात की आम्ही संविधान वाचवत आहोत पण ते संपवण्याचं काम लालू प्रसाद यादव यांच्यासारखे लोक करत आहेत. मोदींनी तर देशाच्या राष्ट्रपतीपदी एका आदिवासी महिलेला संधी दिली आहे. त्यामुळं मोदींनीच या देशात SC-ST समुदायाला संधी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.