Loksabha Election : प्रचाराचे वादळ थंडावले ; सातव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

मार्च महिन्याच्या मध्यावर लोकसभेसाठी सात टप्प्यांत निवडणूक जाहीर झाल्यानंतर देशभर सुरू झालेले प्रचाराचे वादळ आज संध्याकाळी थंडावले.
Loksabha Election
Loksabha Electionsakal
Updated on

नवी दिल्ली : मार्च महिन्याच्या मध्यावर लोकसभेसाठी सात टप्प्यांत निवडणूक जाहीर झाल्यानंतर देशभर सुरू झालेले प्रचाराचे वादळ आज संध्याकाळी थंडावले. निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्याचा प्रचार संपला असून, शनिवारी (ता. १) मतदान होणार आहे. भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आणि विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडी यांच्यातील या लढतीत सर्वच प्रमुख नेत्यांनी प्रचारासाठी दीड ते दोन महिन्यात संपूर्ण भारत पिंजून काढला.

निवडणुकीच्या या टप्प्यात उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील प्रत्येकी १३, प. बंगालमधील नऊ, बिहारमधील आठ, ओडिशामधील सहा, हिमाचल प्रदेशातील चार, झारखंडमधील तीन जागांसाठी, तसेच केंद्रशासित प्रदेश असलेल्या चंडीगडमध्ये मतदान होणार आहे. या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात मतदान होणार आहे. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी मोदी यांनी पंजाबमधील होशियारपूरमध्ये प्रचार सभा घेतली. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी अमृतसर, फरिदकोट आणि रुपनगर या ठिकाणी सभा घेतल्या.

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही ओडिशामध्ये सभा घेत भाजप आणि बिजू जनता दलावर टीकास्त्र सोडले. ‘आप’ नेते व पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी रोड शोमध्ये सहभाग घेतला.

प्रमुख उमेदवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी, अजय राय, कंगना राणावत, विक्रमादित्य सिंह, रवी किशन, अनुराग ठाकूर, अभिषेक बॅनर्जी, अनुप्रिया पटेल, रवीशंकर प्रसाद, तरणजितसिंग संधू, तापस राय, सीता सोरेन, निशिकांत दुबे, मनीष तिवारी, चरणजीतसिंग चन्नी, आनंद शर्मा, मिसा भारती, हरसिमरत कौर बादल, सुदीप बंदोपाध्याय.

मोदींच्या दोनशेवर सभा

पंतप्रधान मोदींनी एकूण ७६ दिवस प्रचार केला. दररोज सरासरी तीन याप्रमाणे त्यांनी एकूण २०६ सभा आणि रोड शो घेतले. यापैकी दिवसभरात पाच राजकीय कार्यक्रम असे त्यांनी तीन दिवस केले, तर दिवसभरात चार राजकीय कार्यक्रम, असे त्यांनी २२ दिवस केले. मोदींनी या काळात अनेक मुलाखतीही दिल्या. मोदींनी मागील निवडणुकीवेळी ६८ दिवसांत १४५ सभा घेतल्या होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.