Supriya Sule : धमकी दिल्यास करेक्ट कार्यक्रम ; सुप्रिया सुळे यांचा इशारा, मंचरमधील सभेत भाजपवर निशाणा

“शिरूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासाठी चांगले वातावरण आहे. सर्वच समाजातील घटकांचा त्यांना पाठिंबा मिळत आहे.
Supriya Sule
Supriya Sulesakal
Updated on

मंचर : “शिरूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्यासाठी चांगले वातावरण आहे. सर्वच समाजातील घटकांचा त्यांना पाठिंबा मिळत आहे. या पार्श्वभूमीवर कोणी धमकी दिली तर थेट मला फोन करा. त्यांना ऑनलाइन किंवा त्यांच्या घरी जाऊन जाब विचारला जाईल. त्यांचा करेक्ट कार्यक्रम करू,” असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.

मंचर (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी (ता. ९) मुस्लिम समाजातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत सुळे बोलत होत्या. या वेळी जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम, जिल्हाप्रमुख सुरेश भोर, दत्ता गांजाळे, सलिम इनामदार, हाजी मन्सूर खान पठाण, पूजा वळसे पाटील, सुरेखा निघोट, सुरेश निघोट, मन्सूर शेख, इसरार पठाण, अब्दुल आतार, शहजाद मिर्झा उपस्थित होते.

सुळे म्हणाल्या, “ज्यांनी घर बांधले, त्यांनाच घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न भाजप जाणीवपूर्वक करत आहे. पण त्यांनी लक्षात ठेवावे, ईस्ट इंडिया कंपनीला ज्याप्रमाणे पळून लावले, त्याप्रमाणे सध्या केंद्रात सत्तेवर असलेल्यांच्या विरोधात लढण्याची ताकद फक्त ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांकडेच आहे. मुस्लिम समाजासह अन्य सर्व घटकांना बरोबर घेऊन जाण्याची ताकद महाविकास आघाडीकडे आहे. या उलट भाजपवाले अल्पसंख्याक समाजाला कशा पद्धतीने त्रास देतात, याची सर्वांना जाणीव आहे. संसदेत महागाई, दूध, कांदा या प्रश्नावर सरकारला धारेवर धरण्याची कुवत डॉ. कोल्हे यांच्याकडे आहे. त्यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा.”

सुप्रिया सुळे म्हणाल्या...

  • चुकीचे कामगार कायदे केले तर माझ्यासह डॉ. कोल्हे उपोषणाला बसतील.

  • शेतकऱ्यांचा कोट्यवधी रुपयांचा कांदा वाया गेला आहे. दूध, शेतीमालाला बाजारभाव नसल्याने शेतकरी चिंतेत. यावर भाजपवाले बोलत नाहीत.

  • भ्रष्टाचाराच्या विरोधात मी आजही बोलते आणि उद्याही बोलणार.

  • मी कुणाचा पाच रुपयाचा चहा कधी पिले नाही. जे काम आहे ते अत्यंत पारदर्शक आहे.

Supriya Sule
Sharad Pawar : ‘मविआ’ला ३० ते ३५ जागा मिळतील ; निवडणुकीच्या तीन टप्प्यांनी पंतप्रधान मोदी अस्वस्थ

भाजपचे सुडाचे राजकारण

घोडेगाव : डॉ. कोल्हे यांच्या प्रचारानिमित्त खासदार सुप्रिया सुळे यांनी घोडेगाव शहरातून प्रचार फेरी काढली. त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी सुळे म्हणाल्या, ‘‘अमोल कोल्हे यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न लोकसभेत पोटतिडकीने मांडले. सत्तेच्या विरोधात बुलंद आवाज त्यांनी लोकसभेत उठवला. भाजपचे सुडाचे राजकारण जनता अनुभवत आहे. ’

बैलगाडा शर्यतींचा लुटला आनंद

पारगाव : खासदार सुळे यांनी आज येथील ग्रामदैवत मुक्तादेवी यात्रेनिमित आयोजित बैलगाडा शर्यतीला भेट देऊन शर्यती पाहण्याचा आनंद घेतला. प्रचारासाठी आल्या असता त्यांनी शर्यतीला भेट दिली. त्यांचा सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.