Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

अजित पवारांच्या पक्षाला मिळालेल्या जागांवरची परिस्थिती कशी आहे, यावरही त्यांनी भाष्य केलं आहे.
Supriya Sule statement sunetra pawar
Supriya Sule statement sunetra pawarsakal
Updated on

पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या उमेदवार सुप्रिया सुळे तर अजित पवार अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनेत्रा पवार या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामध्ये सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्रा पवार यांनाच का उमेदवारी दिली? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. या प्रश्नाचं उत्तर खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं आहे. (Was Sunetra Pawar candidature in Baramati announced due to pressure from BJP Ajit Pawar explained)

Supriya Sule statement sunetra pawar
Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

वरिष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी अजित पवार यांची दीर्घ मुलाखत घेतली. या मुलाखतीत चौफेर विविध तिखट प्रश्नांना अजित पवारांनी उत्तरं दिली आहेत. यामध्ये बारामतीतून सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्याचा निर्णय कुणाचा होता? अजित पवारांचा, खुद्द सुनेत्रा पवारांचा की भाजपच्या दबावाचा? असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. या प्रश्नाला अजितदादांनी एकाच वाक्यात पण थेट उत्तर दिलं. (Latest Marathi News)

Supriya Sule statement sunetra pawar
Kalyan Lok Sabha: कल्याणमधून ठाकरे उमेदवार बदलणार? आणखी एक अर्ज दाखल झाल्यानं चर्चेला उधाण

"सुनेत्रा पवारांना उमेदवारी देण्याचा निर्णय हा या तिघांचाही नव्हता. तर तो निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाचा होता," असं थेट उत्तर यावेळी अजित पवार यांनी दिलं. त्याचबरोबर तुम्ही ज्या ठिकाणी जागा लढवत आहात तिथली परिस्थिती कशी आहे? या प्रश्नावर बोलताना अजित पवार म्हणाले, "जे राजकीय पक्ष जागा लढवत असतात ते जिंकण्याकरताच लढवत असतात" तर मिळालेल्या जागांवर समाधानी आहात का? या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, "आमच्याकडं गेल्यावेळी चार जागा होत्या आत्ता आम्हाला पाच मिळाल्या, तर एक राज्यसभेची जागाही आहे," (Marathi Tajya Batmya)

Supriya Sule statement sunetra pawar
Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

कुटुंबात आपल्याला एकटं पाडायचा प्रयत्न होतो आहे, असं विधान मध्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. त्यामुळं ही राजकीय लढाई कौटुंबिक पातळीवर होईल असं वाटतं का? या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवार म्हणाले, हो कारण आमच्या आजीनं मला सांगितलं होतं की, माझ्या जन्माच्यावेळी वसंतराव पवार हे शेतकरी कामगार पक्षाचे नेते होते त्यावेळी त्यांच्यासाठी पवार कुटुंबातील सर्वच जण काम करत होते. (Latest Maharashtra News)

त्यावेळी शरद पवार हे एकमेव पवार होते जे विद्यार्थी काँग्रेसचं काम करत होते. त्यावेळी काँग्रेसची जागा निवडून आली आणि आमचे आजोबा निवडणुकीत पडले. आमच्या घराण्याला यातून वाईट वाटलं. त्यावेळी सर्व घर एका बाजुला होतं. पण तेव्हा विद्यार्थी दशेत जे होते ते आता सिनिअर आहेत. माझं कुटुंब फार मोठं आहे पण माझ्याविरोधात पवारांचे केवळ तीनच कुटुंब काम करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.