Lok Sabha Election : लोकसभा उमेदवारांच्या पेड न्यूज बातम्यांवर वॉच ठेवण्याचे केंद्रीय खर्च निरीक्षकांचे आदेश

त्या एखाददोन दिवसात लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या उमेदवारी अर्जांसोबतच लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे.
Lok Sabha Election
Lok Sabha Election Sakal
Updated on

उल्हासनगर : येत्या एखाददोन दिवसात लोकसभा मतदार संघातील उमेदवारांच्या उमेदवारी अर्जांसोबतच लोकसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे.अशात केंद्रीय खर्च निरीक्षक नकुल अग्रवाल यांची कल्याण लोकसभा मतदार संघ कार्यालयास भेट दिली असून त्यांनी उमेदवारांच्या पेड न्यूज बातम्यांवर वॉच ठेवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

सोशल मीडियावर दैनंदिन स्वरुपात प्रसिध्द होणा-या बातम्यांचे निरीक्षण करुन सदर बातम्या पेड न्यूज असतील तर तो खर्च संबंधित उमेदवाराच्या निवडणूक खर्चात लावणेबाबतच्या सूचना नकुल अग्रवाल यांनी यावेळी दिल्या.

केंद्रीय खर्च निरीक्षक नकुल अग्रवाल यांनी डोंबिवली (पू.) येथील 24- कल्याण लोकसभा मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते यांच्य कार्यालयास भेट दिली.यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी सुषमा सातपुते व 144 -कल्याण ग्रामीण विधानसभा मतदार संघाचे सहा.निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास गुजर यांनी त्यांचे स्वागत केले.

नकुल अग्रवाल यांनी खर्चविषयक पथकातील अधिकारी वर्गाची बैठक घेऊन त्यांना निवडणूकीच्या कामकाजाविषयी मार्गदर्शन केले.प्रामुख्याने FST(भरारी पथक)SST(स्थिर सनियंत्रण चमू)पथकांनी दक्षतेने काम करण्याबाबत सूचना त्यांनी यावेळी दिल्या.तसेच खर्चाच्या नोंदी अदययावत ठेवणेबाबतच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या.

याप्रसंगी लोकसभा खर्च पथक प्रमुख तथा उल्हासनगर महानगरपालिकेचे मुख्यलेखाधिकारी किरण भिलारे,सहाय्यक खर्च निरीक्षक तथा मुख्यलेखा परीक्षक शरद देशमुख,कल्याण लोकसभा मतदार संघासाठी खर्च विषयक बाबींचे कामकाज बघणेकामी नियुक्त समन्वय अधिकारी दिलीप सूर्यवंशी,कल्याण महापालिकेचे उपायुक्त प्रसाद बोरकर उपस्थित होते.

"उमेदवारांना खर्चाची 95 लाख रुपयांची मर्यादा"

उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते प्रचार यंत्रणाचा शेवटचा दिवस तसेच 20 मे रोजीचे मतदान व मतमोजणीच्या 4 जून पर्यंत उमेदवारांना 95 लाख रुपये खर्च करण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.