Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

ईडीच्या अटकेविरोधात अरविंद केजरीवाल यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे.
arvind kejriwal and supreme court
arvind kejriwal and supreme courtsakal
Updated on

नवी दिल्ली : दिल्लीच्या कथित अबकारी कर घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सध्या ईडीच्या कोठडीत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्यावर ईडीनं अटकेची कारवाई केल्यानं आम आदमी पार्टीनं आक्षेप घेतला आहे.

स्वतः केजरीवाल यांनी ईडीच्या अटकेवर सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टानं ईडीला झटका देत केजरीवालांना दिलासा देणारं विधान केलं आहे. (we can consider Arvind Kejriwal interim bail Supreme Court warning to ED)

न्या. संजीव खन्ना आणि न्या. दिपाकर दत्ता यांच्या खंडपीठानं दुपारी केजरीवालांच्या आव्हान याचिकेवर सुनावणी घेतली. यावेळी ईडीला काही सूचना केल्यानंतर ही सुनावणी मंगळवारपर्यंत पुढे ढकलली. यावेळी खंडपीठानं ईडीच्या वकिलांना म्हटलं की, जर केजरीवालांच्या अंतरिम जामिन प्रकरणी सुनावणीस वेळ लागणार असेल तर आगामी निवडणुका लक्षात घेता आम्ही या प्रकरणात केजरीवालांच्या अंतरिम जामिनाचं प्रकरण सुनावणीसाठी घेऊ शकतो. (Latest Marathi News)

arvind kejriwal and supreme court
Kiran Sarnaik: आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील ४ जणांचा अपघातात मृत्यू! पातूरमध्ये भीषण अपघात

न्या. खन्ना पुढे म्हणाले की, अरविंद केजरीवाल ज्या पदावर आहेत त्यांना काही अधिकृत फाईल्सवर सह्या देखील करायच्या असतील. ही आणखी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, असंही खंडपीठानं ईडीला सांगितलं. पण न्या. खन्ना हे देखील सांगायला विसरले नाहीत की, "यावर मी आता कमेंट करणार नाही. कारण आम्ही कदाचित केजरीवाल यांना अंतरिम जामीन मंजूर करु शकतो किंवा नाही" (Marathi Tajya Batmya)

arvind kejriwal and supreme court
Rahul Gandhi: राहुल गांधींनी रायबरेली निवडल्यानं निरुपम यांचा हल्लाबोल; म्हणाले, पळून गेले...

दरम्यान, या सुनावणीवेळी न्या. खन्ना यांनी दिल्लीतील लोकसभा निवडणुकांच्या तारखा कोणत्या आहेत हे देखील विचारलं. या तारखा २३ मे रोजी आहेत. आज वरिष्ठ विधीज्ञ अभिषेक मनुसिंघवी यांनी केजरीवाल यांच्यावतीनं युक्तिवाद केला तसेच काही कागदपत्रे कोर्टासमोर सादर केली. त्यानंतर अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही राजू हे आपला युक्तीवाद करणार आहेत. राजू हे ईडीची बाजू मांडणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.