Lok Sabha Election: जीपे पोस्टर काय आहे? कसं करतं काम? लोकसभा निवडणुकीत PM नरेंद्र मोदींविरुद्ध DMK चा हायटेक प्रचार

Lok Sabha Election: द्रमुकने संपूर्ण राज्यभरात हायटेक पोस्टर लावले आहेत. या पोस्टरवर एक स्कॅन कोड लावण्यात आला आहे.
GPAY Poster
GPAY Posteresakal
Updated on

Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकांची धामधूम सुरू आहे. नेत्यांच्या प्रचार दौऱ्याला देखील जोर आला. या सर्वांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जातात. तामिळनाडूतील वेल्लोर येथे एका निवडणूक रॅलीत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्रमुक आणि काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. आता द्रमुकने जोरदार पलटवार केला. जीपे पोस्टरच्या माध्यमातून त्यांनी मोदींवर निशाणा साधला.

द्रमुकने संपूर्ण राज्यभरात हायटेक पोस्टर लावले आहेत. या पोस्टरवर एक स्कॅन कोड लावण्यात आला आहे. त्या स्कॅनकोडमध्ये नरेंद्र मोदी यांचा फोटो देखील आहे. हा कोड मोबाईलमध्ये स्कॅन केल्यास नरेंद्र मोदी विरोधातील राजकीय आरोपांचे व्हिडिओ पाहता येतात. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या या हायटेक प्रचाराची राज्यभरात चर्चा आहे.

"स्कॅन करा आणि घोटाळे वाचास असे या या पोस्टर्सवर लिहण्यात आले आहे. यामध्ये क्यूआर कोडऐवजी पंतप्रधान मोदींचे चित्र छापण्यात आले आहे. एखाद्या व्यक्तीने हा कोड आपल्या मोबाइलवरून स्कॅन करताच त्याच्या मोबाइलमध्ये एक पॉप अप व्हिडिओ उघडतो. त्या व्हिडिओमध्ये इलेक्टोरल बाँड घोटाळ्याचा उल्लेख आहे .

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील वेल्लोर येथे निवडणूक रॅलीला संबोधित करताना सत्ताधारी द्रमुक आणि काँग्रेसवर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याच्या एका दिवसानंतर ही पोस्टर्स राज्यभर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी द्रमुकवर घणाघाती हल्ला चढवला.  द्रमुक 'द्वेष आणि फूट पाडणारे राजकारण करते तसेच भ्रष्टाचाराचा समानार्थी आणि राज्याच्या विकासाची काळजी नसल्याचा पक्ष असल्याचे मोदी म्हणाले होते.

GPAY Poster
Lok Sabha Election 2024: एक मत देखील महत्वाचं! शंभर वर्षीय मतदारासाठी निवडणूक पथक पोहचलं तीन राज्यांच्या सीमेवर

द्रमुक ही 'कौटुंबिक कंपनी' असल्याचा आरोप नरेंद्र मोदींनी केला. द्रमुक आपल्या जुन्या विचारसरणीमुळे राज्यातील तरुणांच्या प्रगतीत अडथळा आणत आहे. द्रमुककडे भ्रष्टाचाराचा पहिला कॉपीराइट आहे, संपूर्ण कुटुंब तामिळनाडूला लुटत आहे, असे मोदी म्हणाले.

"द्रमुक भाषा, प्रांत, धर्म आणि जात यांच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडतो. ज्या दिवशी लोकांनी हे ओळखले त्या दिवशी त्यांना एक मतही मिळणार नाही. मी द्रमुकचे दशकभर जुने धोकादायक राजकारण उघड करण्याचे ठरवले आहे. एकीकडे 'मेक इन इंडिया' उपक्रमाने देशाची प्रगती होत आहे, मात्र द्रमुक देशातील गुंतवणूक नष्ट करू इच्छिणाऱ्यांच्या पाठीशी उभा आहे, असा आरोप मोदींनी केला.

GPAY Poster
Sharad Pawar: प्रफुल पटेलांच्या 'त्या' आरोपावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पलटवार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.